Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषदेत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनएलआयसीचे निवृत्त अधिकारी नंदकुमार जाधव यांचे निधन हरिप्रिया एक्स्प्रेसमधील कमी केलेल्या प्रवासी डब्यांची संख्या पूर्ववत करा- परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव ॲक्शन मोडवर, वर्कशॉपची केली पाहणी डीवाय पाटील अभियांत्रिकीच्या  माजी विद्यार्थ्याचे यूपीएससीमध्ये यशमहापालिकेसमोर काँग्रेसचे आंदोलन, भाजपच्या मंत्र्यांनी दिली प्रश्नांच्या सोडवणुकीची ग्वाहीकोल्हापुरात शनिवारी - रविवारी कंदमुळांचा महोत्सवसतेज पाटलांशी हातमिळवणी ही तर अफवाच, जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष महायुतीचाच - हसन मुश्रीफ एकनिष्ठेचे फळ ! गोल्डनमॅनच्या चिरंजीवला मिळाली सभापतिपदाची संधी ! !गोकुळमधील बोगस सभासदांना दिलासा नाही-प्रकाश बेलवाडेंची माहिती

जाहिरात

 

कोल्हापूर महानगर भाजपच्या नऊ मंडल अध्यक्षांच्या निवडी जाहीर

schedule21 Apr 25 person by visibility 724 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाच्या कोल्हापूर महानगर मंडल अध्यक्षांच्या निवडी सोमवारी (२१ एप्रिल) जाहीर करण्यात आल्या. कोल्हापूर महानगर अंतर्गत नऊ मंडल अध्यक्ष आहेत. यामध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभेत सहा तर कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील तीन मंडल अध्यक्ष आहेत. दरम्यान  कोल्हापूर उत्तर विधानसभा व दक्षिण विधानसभा मतदारसंघातील १८६ बूथ समाविष्ठ आहेत. या मंडल अध्यक्षांच्या निवडीसाठी नेते भारत पाटील (सातारा), जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आमदार अमल महाडिक, खासदार धनंजय महाडिक, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

नऊ मंडल अध्यक्षांची नावे पक्षाने जाहीर केली आहेत. यामध्ये कसबा बावडा मंडल अध्यक्षपदी धीरज पाटील, शाहूपुरी मंडल अध्यक्षपदी सचिन कुलकर्णी, लक्ष्मीपुरी मंडल अध्यक्षपदी विशाल शिराळकर, राजारामपुरी उत्तर मंडल अध्यक्षपदी रविकिरण गवळी, राजारामपुरी दक्षिण मंडल अध्यक्षपदी राजगणेश पोळ, मंगळवार पेठ दक्षिण मंडल अध्यक्षपदी प्रितम यादव, शिवाजी पेठ उत्तर मंडल अध्यक्षपदी कोमल देसाई, शिवाजी पेठ दक्षिण मंडल अध्यक्षपदी विनय खोपडे आणि उत्तरेश्वर पेठ मंडल अध्यक्षपदी सुनील पाटील यांची निवड झाली आहे.

दरम्यान या नऊ मंडल अध्यक्ष निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हेमंत आराध्ये, गायत्री राऊत, डॉ. सदानंद राजवर्धन, राजू मोरे, गणेश देसाई, विराज चिखलीकर, संतोष भिवटे, आप्पा लाड, गिरीश साळोखे यांनी काम पाहिले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes