Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मतदानाचा टक्का वाढला ! शिक्षकसाठी ८५.८७ टक्के, पदवीधरसाठी ६२.७८ टक्के !! नवीन आमदार कोण ?सायबर महाविद्यालयात यंदा किर्लोस्कर वसुंधरा फिल्म फेस्टिव्हलशिवाजी विद्यापीठ युवा महोत्सवात डीवाय पाटील अभियांत्रिकीचे विद्यार्थी चमकले पोलंडचे पंतप्रधान लवकरच कोल्हापूरला भेट देणार, युवराज संभाजीराजेंच्यासमोर केली ईच्छा व्यक्तकोल्हापूर वीरशैव लिंगायत समाजाच्या अध्यक्षपदी राहुल नष्टे, उपाध्यक्षपदी चंद्रकांत नासिपुडेवालावलकर हायस्कूलची रिले स्पर्धेत चमक,  विभागीय स्पर्धेसाठी निवडशिक्षकांना शिकवू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या यासाठी आमचा लढापुण्यात  आंतर प्रादेशिक राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा-२०२६चे उद्घाटनकौस्तुभ कामाचा, शिक्षकांच्या हक्काचा…!पार्किंगच्या जागेचा अनधिकृत वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई, हॉटेल्स-हॉस्पिटल्स-व्यापारी संकुलांच्या बांधकामांची तपासणी

जाहिरात

 

कौस्तुभ कामाचा, शिक्षकांच्या हक्काचा…!

schedule22 Oct 26 person by visibility 111 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: कुटुंबीयांला शैक्षणिक कार्याचा मोठा वारसा लाभलेला…संस्थेच्या ज्ञानशाखा शहरापासून खेडयापर्यंत…ग्रामीण भागातील मुले शिक्षणाच्या प्रवाहात सामील व्हावीत, उच्च शिक्षित बनावीत या उद्देशाने साळुंखे कुटुंबीय शिक्षण क्षेत्राच्या सेवेत…त्या कुटुंबींयातील चौथ्या पिढीचे प्रतिनिधीत्व करणारे व श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ मुरलीधर गावडे हे पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातून महायुतीतंर्गत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक  लढवित आहेत. गेली तीन, चार वर्षे शिक्षण क्षेत्रांशी निगडीत विविध विषयावर आवाज, प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा यामुळे त्यांच्या उमेदवारीविषयी शिक्षक मतदारातून ‘कौस्तुभ कामाचा…शिक्षकांच्या हक्काचा…!’अशा भावना आहेत.

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा पाचही जिल्ह्यात त्यांनी संपर्क दौरा केला. शिक्षकांच्या गाठीभेटी घेतल्या. शिक्षकांशी संवाद साधला. महायुतीतील नेतेमंडळीच्या सोबत मतदारसंघाचा दौरा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महायुतीच्या नेतेमंडळीच्या उपस्थितीमध्ये कोल्हापुरात शिक्षक व पदवीधर मेळावा झाला. शिक्षक व पदवीधर मतदारसंघात यंदा महायुतीतंर्गत भाजपचा उमेदवार विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला.

 ‘शिक्षक, शाळा व शिक्षण क्षेत्राविषयी काम करण्याची तळमळ आहे. शिक्षक म्हणून आपण काही वर्षे काम केले आहे, शिक्षकांच्या प्रश्नांची जाण आहे. त्यांना भेडसावणाऱ्या समस्या माहित आहेत. शिक्षकांचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवित आहे.’अशी स्पष्ट भूमिका मांडत कौस्तुभ गावडे हे भूमिका स्पष्ट करत आहेत. शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांच्या विचारकार्याचा वारसा आणि संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या दिवंगत सचिव प्राचार्या शुभांगी गावडे  यांच्या संस्काराचा वसा घेऊन ते शिक्षण क्षेत्रात वाटचाल करत आहेत. जुनी पेन्शन योजना, टीईटी विषय यासंदर्भातील आंदोलनात आघाडीवर राहिले.

‘जुनी पेन्शन योजना, अन्यायकारी संच मान्यतेचा आदेश रद्द झाला पाहिजे, प्राध्यापक व शिक्षक भरती, वेतनेतर अनुदान, प्राध्यापकांची सेवा व रोजगार सुरक्षित ठेवतानाच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे. यासाठी पदसंख्या निश्चित करण्याचे धोरण न्याय, पारदर्शकव वास्तवाधारित असावे. यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा करू. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही. आश्रमशाळांच्या सुधारणासाठी कटिबद्ध राहू.’अशी ग्वाही गावडे यांनी दिली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes