वालावलकर हायस्कूलची रिले स्पर्धेत चमक, विभागीय स्पर्धेसाठी निवड
schedule23 Oct 26 person by visibility 29 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शांतारामपंत वालावलकर हायस्कूलने मनपा शालेय जिल्हास्तरीय ४x १०० रिले या क्रीडा प्रकारात १७ वर्षाखालील मुलांच्या गटात अत्यंत चुरशीच्या सामन्यात धवल यश संपादन करीत द्वितीय क्रमांक पटकावला. शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावरती या स्पर्धा पार पडल्या. सांघिक स्पर्धेत पंत वालावलकर हायस्कूलने बेसबॉल, सॉफ्टबॉल या स्पर्धेतही आपली लक्षवेधक कामगिरी करून १४ आणि १७ या मुला - मुलींच्या चार ही गटात अव्वल स्थान पटकावून हे संघ विभागीय स्पर्धेसाठी मोठ्या दिमाखात दाखल झाले आहेत या संघाना शाळेचे क्रीडाशिक्षक आणि राष्ट्रीय प्रशिक्षक राजेंद्र बनसोडे, क्रीडाशिक्षक समीर जमादार, सागर वाडकर यांचे मार्गदर्शन तर मुख्याध्यापक सरीता शिंदे, पर्यवेक्षिका सरीता शिंदे यांचे प्रोत्साहन लाभलेा्र. शालेय समितीचे चेअरमन संजीवभाई परीख, आंतरभारती संस्थेचे ज्येष्ठ संचालक आणि माजी सचिव एम.एस. पाटोळे यांनी विजेत्या खेळाडूंचे आणि मार्गदर्शकांचे तसेच मुख्याध्यापकांचे अभिनंदन केले .