पोलंडचे पंतप्रधान लवकरच कोल्हापूरला भेट देणार, युवराज संभाजीराजेंच्यासमोर केली ईच्छा व्यक्त
schedule23 Oct 26 person by visibility 19 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी -: भारत दौऱ्यावर असलेले पोलंडचे प्रधानमंत्री डोनाल्ड टस्क यांची बेंगळुरू येथे युवराज संभाजीराजे यांनी शुक्रवारी २३ ऑक्टोबर २०२६ भेट घेतली. यावेळी कोल्हापूर - पोलंडच्या ऐतिहासिक संबंधांना उजाळा दिला. इतिहासातील हे संबंध वृद्धिंगत करण्यासाठी दोन्ही राष्ट्रांच्या माध्यमातून शैक्षणिक व सांस्कृतिक देवाणघेवाण करण्याबाबत, त्याचबरोबर दोन्ही राष्ट्रांमध्ये व्यापार, उद्योग, गुंतवणूक व पर्यटन क्षेत्रांना चालना देण्याबाबत प्रदीर्घ चर्चा झाली. कोल्हापूर येथे पोलंड मधील उद्योगांचे औद्योगिक हब उभारण्याबाबत प्रधानमंत्री टस्क यांना आवाहन केले. यावेळी प्रधानमंत्री टस्क यांनी लवकरच कोल्हापूर व प्रस्तावित वळीवडे म्युझियमला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. या संदर्भातील माहिती युवराज संभाजीराजे यांनी दिली.