Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिक्षकांना शिकवू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या यासाठी आमचा लढापुण्यात  आंतर प्रादेशिक राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा-२०२६चे उद्घाटनकौस्तुभ कामाचा, शिक्षकांच्या हक्काचा…!पार्किंगच्या जागेचा अनधिकृत वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई, हॉटेल्स-हॉस्पिटल्स-व्यापारी संकुलांच्या बांधकामांची तपासणीस्मॅकच्या वार्षिक सभेत यतीन शाहांच्या मुलाखतीतून गवसली उद्योग - व्यवसायाची यशस्वितेची सूत्रे, सहा युवा उद्योजकांचा गौरवकेएमएतर्फे दोन दिवसीय वैद्यकीय परिषद, डॉ. विवेकानंद कुलकर्णींना जीवन गौरव पुरस्कारऑडिओ क्लिपमधील चर्चा करणारे भाजपशी संबधित, भाजपने स्पष्टीकरण द्यावे - मंत्री उदय सामंत शिक्षक-शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी  प्रा. जयंत आसगावकर यांना विजयी करा : मालोजीराजे छत्रपती सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता, १५६ जणांवर कारवाईप्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध- कौस्तुभ गावडे

जाहिरात

 

पार्किंगच्या जागेचा अनधिकृत वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई, हॉटेल्स-हॉस्पिटल्स-व्यापारी संकुलांच्या बांधकामांची तपासणी

schedule22 Oct 26 person by visibility 10 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी: कोल्हापूर महानगरपालिकेच्या नगररचना विभागामार्फत शहरातील हॉटेल्स, लॉजिंग, हॉस्पिटल्स, व्यापारी संकुले तसेच इतर आस्थापनांच्या बांधकामांची आणि पार्किंगच्या जागेची प्रत्यक्ष जागेवर पाहणी करण्यात येणार आहे. मंजूर बांधकाम नकाशानुसार बांधकाम केले आहे का, तसेच पार्किंगसाठी आरक्षित जागेचा योग्य वापर होत आहे का, याची तपासणी विशेष उपद्रव शोध पथकाच्या माध्यमातून केली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिला आहे.

तपासणी मोहिमेदरम्यान संबंधित आस्थापनांच्या मालकांनी महापालिकेकडून मंजूर करून घेतलेला मूळ बांधकाम नकाशा आणि बांधकाम परवानगी प्रमाणपत्र तपासणी अधिकाऱ्यांसमोर सादर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे सर्व संबंधितांनी आवश्यक कागदपत्रे आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी उपलब्ध करुन ठेवावीत असे आवाहन महापालिकेच्या नगररचना विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. शहरातील काही आस्थापनांमध्ये मंजूर बांधकाम नकाशानुसार पार्किंगसाठी राखीव असलेल्या जागेचा इतर कारणांसाठी वापर केला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. तपासणीदरम्यान पार्किंग किंवा अन्य जागेचा अनधिकृत वापर होत असल्याचे आढळल्यास संबंधित मालमत्ताधारकांविरुद्ध महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ मधील कलम ५२ व ५३ अन्वये नियमानुसार दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes