मतदानाचा टक्का वाढला ! शिक्षकसाठी ८५.८७ टक्के, पदवीधरसाठी ६२.७८ टक्के !! नवीन आमदार कोण ?
schedule23 Oct 26 person by visibility 146 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर पुणे विभागीय शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी शुक्रवारी (२३ ऑक्टोबर २०२६) चुरशीने मतदान झाले. पुणे विभागीय मतदारसंघात समाविष्ठ पाचही जिल्ह्यात दिवसभर मतदानाच्या रांगा होत्या. शिक्षक मतदारसंघासाठी अधिक चुरस पाहावयास मिळाली. शिक्षक मतदारसंघासाठी ८५.८७ टक्के मतदान झाले. पदवीधरसाठी मतदानाची टक्केवारी ६२.७८ टक्के पोहोचली. यंदा, शिक्षकसाठी ३० उमेदवार रिंगणात होते. तर पदवीधरमध्ये ४७ उमेदवारांनी नशीब आजमावले. पुणे येथे २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. मतदानाचा टक्का वाढला आहे, मतदार आमदार म्हणून कोणाला कौल देणार याविषयी उत्सुकता वाढली.
निवडणूक निर्णय अधिकारी तुषार ठोंबरे यांनी पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्यांनी म्हटल आहे, ‘दोन्ही मतदारसंघातील मतदानाचा हा अहवाल अंतरिम आहे. मतदानाच्या अंतिम टक्केवारीचा अहवाल केंद्राध्यक्ष दैनंदिनी, मतदानाचा हिशेब तपासून सादर करण्यात येणार आहे.’
सकाळी आठ ते दुपारी चार अशी मतदानाची वेळ होती. दरम्यान कोल्हापुरात विविध केंद्रावर बोगस मतदानाचे प्रकार घडले. यावरुन मतदारांनी मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. कोल्हापूर जिल्ह्यात मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार संजय घाटगे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक आदींनी विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्या.
शिक्षक व पदवीधर मतदारसंघात उमेदवारांच्या संख्या जास्त असल्याने बहुरंगी लढतीचे चित्र होते. दरम्यान शिक्षक मतदारसंघात भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर, माजी आमदार दत्तात्रय सावंत, शिवसेनेने पाठिंबा दिलेले सचिन सानप, पंढरपूर येथील बी. पी. रोंगे हे प्रमुख रिंगणात होते. पदवीधर मतदारसंघामध्ये महायुतीतंर्गत भाजपकडून डॉ. स्मिता जाधव, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या हर्षवर्धन देशमुख जाधव, शिवसेना ठाकरे पक्षाकडून नगरसेवक सुनील मोदी यांच्यासह अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.
शिक्षक मतदारसंघात प्रचंड चुरशीने मतदान
पुणे शिक्षक मतदारसंघात दुपारी चार वाजेपर्यंत ८५.८७ टक्के मतदान झाले. एकूण ६१९४० मतदारापैकी ५३१८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. पुणे जिल्ह्यातील १६८२२ मतदारापैकी १३१३५ इतक्या मतदारांनी मतदान केले. पुण्यातील मतदानाची टक्केवारी ७८.०८ इतकी आहे. सोलापूर जिल्ह्यात ८९ टक्के मतदान झाले. १५३०३ एकूण मतदार आहेत. त्यापैकी सोलापूर जिल्ह्यातील १३६१९ मतदारांनी मतदान केले. सातारा जिल्ह्यातील एकूण ९४५४ मतदारांपैकी ८४५१ मतदारांनी मतदान करत ८९.३९ टक्के मतदानाची नोंद केली. सांगली जिल्ह्यातील मतदारांची संख्या ८०६२ इतकी आहे. त्यापैकी ७०८१ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ८७.८३ आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांची संख्या १२२९९ इतकी आहे. त्यापैकी १०८९९ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ८८.६२ टक्क्यापर्यंत पोहोचली.
पदवीधरसाठी कोल्हापुरात सर्वाधिक मतदान
पदवीधर मतदारसंघात दुपारी चार वाजेपर्यंत ६२.७८ टक्के मतदानाची नोंद झाली. त्यापैकी ३,८८,०१९ मतदारांपैकी २४३६११ इतक्या जणांनी मतदान केले. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक ११४५६२ इतके विक्रमी मतदार नोंदणी झाली होती. त्यापैकी ७३१२९ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ६३.८३ टक्के इतकी झाली.पुणे जिल्ह्यातील मतदार नोंदणी ८८२०२ होती. त्यापैकी ५४२२१ पदवीधर मतदारांनी मतदान नोंदविले. येथे ६१.४७ टक्के मतदान झाले. सोलापूर जिल्ह्यातील ४९७७२ मतदारांपैकी ३५५१३ मतदारांनी मतदान केले. ७१.४२ टक्के मतदान झाले. सातारा जिल्ह्यात ४७४६३ इतके मतदार आहेत. त्यापैकी ३१६६४ मतदारांनी मतदान केल्यामुळे टक्केवारी ६६.९२ पर्यत पोहोचली.सांगली जिल्ह्यातील एकूण मतदार संख्या ८८०७० इतकी आहे. त्यापैकी ४८९८४ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ५५.६२ टक्के आहे