Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सायबर महाविद्यालयात यंदा किर्लोस्कर वसुंधरा फिल्म फेस्टिव्हलशिवाजी विद्यापीठ युवा महोत्सवात डीवाय पाटील अभियांत्रिकीचे विद्यार्थी चमकले पोलंडचे पंतप्रधान लवकरच कोल्हापूरला भेट देणार, युवराज संभाजीराजेंच्यासमोर केली ईच्छा व्यक्तकोल्हापूर वीरशैव लिंगायत समाजाच्या अध्यक्षपदी राहुल नष्टे, उपाध्यक्षपदी चंद्रकांत नासिपुडेवालावलकर हायस्कूलची रिले स्पर्धेत चमक,  विभागीय स्पर्धेसाठी निवडशिक्षकांना शिकवू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या यासाठी आमचा लढापुण्यात  आंतर प्रादेशिक राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा-२०२६चे उद्घाटनकौस्तुभ कामाचा, शिक्षकांच्या हक्काचा…!पार्किंगच्या जागेचा अनधिकृत वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई, हॉटेल्स-हॉस्पिटल्स-व्यापारी संकुलांच्या बांधकामांची तपासणीस्मॅकच्या वार्षिक सभेत यतीन शाहांच्या मुलाखतीतून गवसली उद्योग - व्यवसायाची यशस्वितेची सूत्रे, सहा युवा उद्योजकांचा गौरव

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठ युवा महोत्सवात डीवाय पाटील अभियांत्रिकीचे विद्यार्थी चमकले 

schedule23 Oct 26 person by visibility 14 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या ४६ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवामध्ये डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयाने सांस्कृतिक आणि बौद्धिक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत स्पर्धेवर ठसा उमटवला. प्रश्नमंजुषेत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी द्वितीय तर  हिंदी वक्तृत्व स्पर्धेत चौथा क्रमांक मिळवला.

जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर येथे आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लोकनृत्य, वादविवाद, हिंदी वक्तृत्व, इंग्रजी वक्तृत्व आणि प्रश्नमंजुषा या स्पर्धा प्रकारांत यश मिळवले. यानंतर मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे आयोजित मध्यवर्ती युवा महोत्सवामध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धेत अथर्व मस्के, परीक्षित जाधव आणि श्रावणी चव्हाण यांच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच हिंदी वक्तृत्व स्पर्धेत नेहा जाधव हिने आपल्या प्रभावी वक्तृत्वाच्या जोरावर चौथा क्रमांक मिळवला. सांस्कृतिक विभाग समन्वयक प्रा. मिलिंद वडगावे व डीन स्टुडंट अफेअर्स डॉ. आर. ए. पाटील यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संजय पवार, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे यांनी अभिनंदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes