Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूर वीरशैव लिंगायत समाजाच्या अध्यक्षपदी राहुल नष्टे, उपाध्यक्षपदी चंद्रकांत नासिपुडेवालावलकर हायस्कूलची रिले स्पर्धेत चमक,  विभागीय स्पर्धेसाठी निवडशिक्षकांना शिकवू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या यासाठी आमचा लढापुण्यात  आंतर प्रादेशिक राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा-२०२६चे उद्घाटनकौस्तुभ कामाचा, शिक्षकांच्या हक्काचा…!पार्किंगच्या जागेचा अनधिकृत वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई, हॉटेल्स-हॉस्पिटल्स-व्यापारी संकुलांच्या बांधकामांची तपासणीस्मॅकच्या वार्षिक सभेत यतीन शाहांच्या मुलाखतीतून गवसली उद्योग - व्यवसायाची यशस्वितेची सूत्रे, सहा युवा उद्योजकांचा गौरवकेएमएतर्फे दोन दिवसीय वैद्यकीय परिषद, डॉ. विवेकानंद कुलकर्णींना जीवन गौरव पुरस्कारऑडिओ क्लिपमधील चर्चा करणारे भाजपशी संबधित, भाजपने स्पष्टीकरण द्यावे - मंत्री उदय सामंत शिक्षक-शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी  प्रा. जयंत आसगावकर यांना विजयी करा : मालोजीराजे छत्रपती 

जाहिरात

 

कोल्हापूर वीरशैव लिंगायत समाजाच्या अध्यक्षपदी राहुल नष्टे, उपाध्यक्षपदी चंद्रकांत नासिपुडे

schedule23 Oct 26 person by visibility 39 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: कोल्हापूर वीरशैव लिंगायत समाजाच्या अध्यक्षपदी राहुल अशोक नष्टे, उपाध्यक्षपदी चंद्रकांत मल्लाप्पाणा नासिपुडे तर सचिवपदी सुनिल शशिकांत गाताडे यांची निवड झाली. समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक व संचालक नानासाहेब नष्टे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत २०२६ -२७ या वर्षासाठी कार्यकारिणी निवडण्यात आली. कार्यकारिणीची बिनविरोध निवड झाली. संचालक मंडळात नानासाहेब नष्टे, मनोहर गाडवे,  राजेश पाटील चंदूरकर, सुहास भेंडे, राजशेखर वाली, अॅड.सतीश खोतलांडे, चंद्रकांत हळदे, कुमार हिरेमठ, किरण गवळी, संजय बोधले, राजेंद्र करंबळी, प्रशांत करंबळी, धर्मेंद्र नष्टे, गणेश सन्नकी, अविनाश नासिपुडे, केतन तवटे, सत्यजीत सांगावकर, गुरुदेव स्वामी आणि व्यवस्थापकपदी बी. एस पाटील यांची निवड झाली. मावळते अध्यक्ष किरण गवळी यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.‘’ज्येष्ठांचे मार्गदर्शन व संचालक मंडळाला सोबत घेऊन समाजाच्या उत्कर्षासाठी काम करणार आहोत.’असे नूतन पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes