Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
दुधाळ जनावरांसाठी पॅरामेट्रिक विमा योजना -  चेअरमन नविद मुश्रीफशिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, अर्थसंकल्पानंतर व्यापक बैठक श्रीशैल देवस्थानात सोळा ते वीस मार्च दरम्यान उगादी महोत्सव जिल्ह्यात सोळा मार्चपासून विशेष हेल्मेट तपासणी मोहीम, नो हेल्मेट - नो एट्री जात प्रमाणपत्रे खोटी, नगराध्यक्षसह जिल्हा परिषद सदस्य, नगरसेविकेंवर गंभीर आरोप, नऊ मार्चला कोल्हापुरात मोर्चाकळंबा तलावात कचरा, टाकाऊ वस्तू, खरमातीचा ढिगारा ! कळंबा -पाचगाव ग्रामपंचायतीचे पूर्णत: दुर्लक्ष!!कैलासगडची स्वारी मंदिर पालखी सोहळा दिमाखातजुनी पेन्शनसाठी साखळी उपोषण : शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलनजिल्हा परिषद शिवसेनेच्या गटनेतेपदी अरुण जाधव ! यड्रावकर गट शिवसेनेसोबतच!! कोल्हापूरकरांचे प्रेम हे कलावंताला प्रेरणादायी: अभिनेते सुनील बर्वे 

जाहिरात

 

मिशन ५० हजार घरकुलासाठी जिप प्रयत्नशील - प्रभारी प्रकल्प संचालक संतोष जोशी

schedule22 Nov 25 person by visibility 227 categoryक्रीडाजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : कोल्हापूर जिल्ह्यात मिशन पन्नास हजार घरकुल मोहीम आखली आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून ही मोहीम राबविली जात असून या मोहिमेंतर्गत घरकुलांचे बांधकाम डिसेंबर २०२५ अखेर पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद प्रयत्नशील आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्या मार्गदर्शनाखाली कामे सुरू आहेत अशी माहिती प्रभारी प्रकल्प संचालक व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी सांगितले.

मिशन पन्नास हजार अतंर्गत घरकुले पूर्ण करणेबाबत सर्व गटविकास अधिकारी यांचा दर मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्याकडून आढावा घेतला जातो. घरकुल शुभारंभ मोहिमेमध्ये सुरु नसलेल्या घरकुलापैकी मोहिमेमध्ये १०५०० घरकुलांचे बांधकाम सुरु झाले आहे. प्रभारी प्रकल्प संचालक संतोष जोशी यांनी तालुका स्तरावर सर्व पंचायत समितीस भेटी देऊन ग्रामरोजगार सेवक, ग्रामपंचायत अधिकारी, गट विकास अधिकारी, पालक अधिकारी व संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांचा मिशन 50 हजार घरकुलाबाबत आढावा घेतला आहे. तसेच सर्व घरे ३१ डिसेंबर २०२५ अखेर पूर्ण करण्याविषयी सूचना केल्या आहेत. २०२४ – २५ व २०२५ – २६ या काळात प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन ग्रामीण अंतर्गत ५३ हजार ८३६ घरकुले मंजूर आहेत. मंजूर घरकुलांपैकी ३० हजार ८८१ घरकुलांचे बांधकाम सुरू आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes