तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयात करिअर संधी विषयक कार्यशाळा
schedule24 Nov 25 person by visibility 21 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : वारणा विद्यापीठाच्या तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयात जर्मन भाषा, जर्मनीतील उच्च शिक्षण व उपलब्ध करिअर संधी या विषयावर कार्यशाळेचे आयोजन २८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता केले आहे. विद्यार्थ्यांना परदेशातील बहुविद्याशाखीय शिक्षणाची ओळख करून देणे आणि जर्मन भाषा परदेशी भाषा म्हणून शिकण्याचे महत्त्व समजावणे हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश असल्याचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी सांगितले. या कार्यशाळेत वैशाली दाबके या मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेचे समन्वयक डॉ. एस. व्ही. लिंगराजु असतील. या उपक्रमासाठी इच्छुक विद्यार्थी व वाचकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.