टीईटी पेपर फोडण्याचा कट पोलिसांनी उधळला, नऊ जणांना घेतले ताब्यात
schedule23 Nov 25 person by visibility 43 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : संपूर्ण राज्यभरात रविवारी , शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) झाली. दरम्यान क या परीक्षेचा पेपर फोडण्याचा कट कोल्हापुरात पोलिसांनी उधळळला. कागल तालुक्यातील सोनगे येथून पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेतले आहे. मुरगूड पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. ताब्यात घेतलेले आरोप ही राधानगरी कागल तालुक्यातील आहेत. परीक्षार्थींना परीक्षा सुरू होण्याअगोदरच पेपर आधी देण्याचा डाव या टोळीचा होता.परीक्षार्थीनीकडून त्यांची मूळ कागदपत्रे व मोठी रक्कम हडपण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला ताब्यात घेतले. तसेच सोळा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शनिवारी सायंकाळपासूनच पोलिस या घटनेचा शोध घेत होते.
दरम्यान जिल्ह्यातील विविध केंद्रावर ही परीक्षा जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार झाली. पेपर क्रमांक एक व दोन मिळून एकूण ६३ परीक्षा केंद्रावर १८७३७ उमेदवारांनी ही परीक्षा दिली. परीक्षेला ११०२ उमेदवार गैरहजर राहिले. या परीक्षेसाठी प्रशासनाने चोख व्यवस्था केली होती.परीक्षा केंद्रावर परीक्षार्थांची बायोमेट्रिक हजेरी घेण्यात आली. तसेच प्रत्येक वर्ग खोल्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर होती. दरम्यान या परीक्षेविषयक कडक नियमांचा फटका उशिरा परीक्षा केंद्रावर दाखल झालेल्या शिक्षकांना बसला. तर काही ठिकाणी हॉल तिकिटावरील खोल नंबर व प्रत्यक्षातील खोली नंबर यामध्ये फरक होता असे उमेदवारांनी सांगितले.