टीईटी पेपर फुटी प्रकरणी आणखी ११ जणांना अटक, आरोपींची संख्या १८ पर्यंत पोहोचली
schedule24 Nov 25 person by visibility 237 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शित्रक पात्रता परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी पोलिसांनी गेल्या दोन दिवसात एकूण १८ जणांना अटक केली आहे. रविवारी रात्री सात जण तर सोमवारी आणखी ११ आरोपींना अटक केली आहे. टी.ई.टी. परिक्षेचा पेपर परीक्षेपुर्वी देतो असे सांगून काही विद्यार्थ्यांना बोलावून त्यांचेकडून शैक्षणिक मुळ कागदपत्र व रोख रक्कम स्विकारुन फसवणूक करीत असल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. रविवारी रात्री सात आरोपांनी आटक केली होती. या प्रकरणी आणखी अकरा जणांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यांना २५ नोव्हेंबर २०२५ पर्यत पोलिस कोठडी मिळाली आहे.
पोलिसांनी कागल तालुक्यातील सोनगे येथील शिवकृपा फर्नीचर मॉलमध्ये छापा टाकून पेपर फोडण्याचा डाव उधळून लावला होता. पोलिसांनी, मॉलवर छापा टाकून गुन्हा दाखल केला त्यावेळी सात आरोपी मिळून आले होते.यातील मुख्य सुत्रधार महेश भगवान गायकवाड, सातारा हा फरारी होता. गुन्हा दाखल झालेनंतर अटक सात आरोपींची २५ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर होती. पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आरोपीकडे तसेच गुन्हयाचे ठिकाणी मिळालेले पुराव्याचे आधारे सखोल तपास करून या गुन्हयात सहभागी असणारे आणखीन अकरा जणांना अटक केली आहे. यामध्ये रोहीत पांडुरंग सावंत, (कासारपुतळे, ता. राधानगरी) जि. कोल्हापूर, 02) अभिजीत विष्णू पाटील, व.व.40, (रा.बोरवडे, ता. कागल) जि. कोल्हापूर, 03) संदिप भगवान गायकवाड, व.व. 46, रा. (बेलवाडी, ता. कराड) अमोल पांडुरंग जरग ( सरवडे, ता. राधानगरी). स्वप्निल शंकर पोवार (कासारपुतळे, ता. राधानगरी), रणधीर तुकाराम शेवाळे (सैदापूर, ता. कराड), तेजस दिपक मुळीक (निमसोड, ता. कडेगांव, जि. सांगली), प्रणय नवनाथ सुतार (खोजेवाडी, जि. सातारा) संदिप शिवाजी चव्हाण (कोपर्डे हवेली, ता. कराड) श्रीकांत नथुराम चव्हाण (विद्यानगर कराड ) यांना तसेच रॅकेटचा मुख्य सुत्रधार महेश भगवान गायकवाड ( बेलवाडी, ता. कराड) यास कराड येथून ताब्यात घेतले आहे.
पोलिस अधीक्षक योगेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, संतोष गळवे, मुरगूड पोलीस ठाणा येथील सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी करे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलीस अमंलदार युवराज पाटील, राजेश राठोड, विनोद चौगुले, प्रदिप पाटील, राजू कोरे, रोहीत मर्दाने, विजय गोसावी, अमित सर्जे, अमित मर्दाने, निवृत्ती माळी, महेश खोत, सागर चौगुले, महेश आंबी, राजेंद्र वरंडेकर, सुशिल पाटील, शिवानंद मठपती तसेच सायबर पोलीस ठाणेचे पोलीस अमंलदार सुरेश राठोड यांनी केली आहे.