Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूर जिल्ह्यात नगराध्यक्षपदासाठी ५६! नगरसेवकपदासाठी ८०९ उमेदवार रिंगणात ! !गायक शिक्षक मंचचा सोमवारी सातवा वर्धापनदिन, नाईन्टीज मेलडी संगीत मैफिल संशोधनाचे पेटंट घेऊन व्यावसायीकरण करणे महत्त्वाचे : डॉ. डी. टी. शिर्केआयुक्तांनी केली रस्ते कामाची पाहणी, अधिकाऱ्यांसह ठेकेदारांना सक्त सूचनापूरग्रस्तांना मदत, विवेकानंद कॉलेजचा पुण्यात सन्मान ! उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून गौरव!!रिंगरोडला महापालिकेतर्फे हॉस्पिटल, झूम प्रकल्प येथे सीएनजी गॅस प्रकल्प ! अमल महाडिकांची अधिकाऱ्यांसोबत चर्चाजिल्ह्यात तीस हजाराहून अधिक घरकुलांचे काम सुरू ! डिसेंबर अखेर ५० हजार घरकुलासाठी मोहिम ! !आठ महिने उलटले, सिनेट सभा नाही ! नियमांचे उल्लंघन,  प्रशासनाची चालढकल ! !कागलमध्ये राजकीय घमासान, मंडलिक-मुश्रीफांत हल्लाबोलमेन राजारामच्या विजयी खेळाडूंची वाजतगाजत मिरवणूक ! स्वागताला अधिकारी !!

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्ह्यात नगराध्यक्षपदासाठी ५६! नगरसेवकपदासाठी ८०९ उमेदवार रिंगणात ! !

schedule22 Nov 25 person by visibility 16 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीनंतर राजकीय चित्र स्पष्ट झाले.जिल्ह्यातील १३ नगरपालिका व नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी ५६ उमेदवार तर नगरसेवकपदासाठी ८०९ उमेदवार रिंगणात आहेत. कागल, जयसिंगपूर, गडहिंग्लज, कुरुंदवाड , हुपरी, हातकणंगले, आजरा, शिरोळ येथे बहुरंगी लढती आहेत. पेठवडगाव व चंदगडमध्ये नगराध्यक्षपदासाठी बहुरंगी तर मुरगुडमध्ये नगराध्यक्षपदासाठी दुरंगी लढत आहे.

 नगरपालिका व नगरपंचायतीसाठी दोन डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. हातकणंगले नगराध्यक्षपदासाठी सात, चंदगड नगराध्यक्षपदासाठी तीन, आजरा नगराध्यक्षपदासाठी सहा, हुपरी नगराध्यक्षपदासाठी सहा, शिरोळ येथे चार, मलकापूर व वडगाव येथील नगराध्यक्षपदासाठी प्रत्येकी तीन , मुरगुड व पन्हाळा नगराध्यक्षपदासाठी प्रत्येकी दोन उमेदवार आहेत. कुरुंदवाड नगराध्यक्षपदासाठी चार, कागल नगराध्यक्षपदासाठी पाच, गडहिंग्लज येथे सहा, जयसिंगपूर येथे पाच उमेदवार नगराध्यक्षपदासाठी लढत आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत राजकीय आघाडया निर्माण झाल्या आहेत. काही तालुक्यात तर टोकाचे राजकीय विरोधक मंडळी एकवटली आहेत. जयसिंगपूरमध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विरोधात काँग्रेस, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी शरद पवार एकवटले आहेत. कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ व शाहू ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाटगे यांची आघाडी आहे. या ठिकाणी माजी खासदार संजय मंडलिक हे या नव्या युतीच्या विरोधात लढाई करत आहेत. मुरगूडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्ष विरुद्ध भाजप, शिवसेना एकत्र लढत आहेत. येथेही मुश्रीफ विरुद्ध मंडलिक गट अशी लढत आहे. पन्हाळा नगरपालिकेन जनसुराज्य शक्ती पक्ष, भोसले गट, मोकाशी गट विरुद्ध अपक्ष अशी लढत या आहे. येथे आघाडीच्या सहा जागा बिनविरोध झाल्या आहेत.हातकणंगले नगरपालिकेसाठी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी असे सगळे पक्ष रिंगणात आहेत. हुपरी येथे बहुरंगी लढत आहे.

चंदगड येथे आमदार शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजप व शिवसेना शिंदे गट एकत्र आहेत. याठिकाणी माजी आमदार राजेश पाटील, नंदिनी बाभूळकर यांची आघाडी आहे. वडगाव येथे सालपे व यादव या दोन गटाभोवती राजकारण फिरत आहे. मलकापूर येथे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या विरोधात इतर सगळे पक्ष एकवटले आहेत. जनसुराज्यच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष एकवटले आहेत. आजरा येथे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील व भाजपाचे खासदार धनंजय महाडिक समर्थकांतच लढत आहे. महाडिक समर्थक अशोक चराटी यांची ताराराणी आघाडी आहे. कुरुंदवाड  व शिरोळ येथे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू आघाडीविरोधात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटना अशी लढत आहे. गडहिंग्लजमध्ये जनता दल, जनसुराज्य शक्ती पक्ष, भाजप, शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार पक्ष अशी लढत आहे. दरम्यान उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी राजकीय घडामोडी घडल्या. उमेदवार अर्ज माघारीसाठी साम, दाम, दंड या नितीचा वापर केला.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes