Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूरच्या क्रिएटिव्ह शिक्षकांचा अभ्यास दौरा, जागतिक स्तरावरील शाळा भेटीचाधूल चेहरे पे थी, लेकिन आईना साफ करता रहा ! मुश्रीफांचा संजय मंडलिकांना उद्देशून टोलानगरसेवकांच्या पसंतीतून गटनेत्याची निवड, घोषणा कोल्हापुरातून नव्हे भाजपा प्रदेशकडून होणारमहापौर - उपमहापौर निवड तीस किंवा ३१ जानेवारीला! महापालिकेने मागविले निवडीसंबंधी मार्गदर्शन ! !शिवसेनेतर्फे शिवसेनाप्रमुखांना अभिवादन, नूतन नगरसेवकांचा सत्कार क्रीडाई कोल्हापूरतर्फे तीस जानेवारीपासून चार दिवसीय दालन प्रदर्शन ! वास्तू विषयक १७० स्टॉल्सचा समावेश ! !भाजपकडून शिराळे, खाडे, देसाई, कुंभारांची नावे चर्चेत ! शिवसेनेचाही महापौरपदावर दावा !!कोल्हापूर - इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव !जिल्हा परिषदेची निवडणूक, कार्यकर्त्यांच्या सन्मानाची ! कार्यकर्त्यांना पद, राजकारणात मोठं करणं हा महाडिक पॅटर्न ! !भाजपकडून जिपसाठी ४१, पंचायत समितीसाठी ७२ उमेदवार ! काही तालुक्यात स्वतंत्र, काही ठिकाणी युती! !

जाहिरात

 

शहाजी लॉ कॉलेजच्या मैदानावर आंतरविभागीय बास्केटबॉल स्पर्धा, बारा संघांचा सहभाग

schedule22 Nov 25 person by visibility 212 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ क्रीडा अधिविभागाच्या वतीने शहाजी लॉ कॉलेज येथे शिवाजी विद्यापीठ अंतर्गत आंतरविभागीय बास्केटबॉल पुरुष स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत संलग्न महाविद्यालयातील एकूण बारा संघ पात्र ठरले आहेत. दरम्यान शनिवारी झालेल्या सामन्यांमधून न्यू कॉलेज कोल्हापूर, नाईट कॉलेज कोल्हापूर, मिरज महाविद्यालय मिरज आणि विजयसिंह यादव महाविद्यालय पेठवाडगाव यांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. या स्पर्धेमधून पुढील महिन्यात नांदेड येथे होणाऱ्या क्रीडा महोत्सव २०२५ आणि पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ स्पर्धेकरिता शिवाजी विद्यापीठाचा संघ निवडला जाणार आहे. दरम्यान कौन्सिल ऑफ एज्युकेशन सचिव विश्वनाथ मगदूम यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी देशभक्त रत्नाप्पण्णा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सच्या प्राचार्या डॉ वर्षा मैंदर्गी, शहाजी लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रवीण पाटील, बास्केटबॉल पुरुष निवड समितीचे चेअरमन डॉ नंदकुमार पाटील, सदस्य डॉ आकाश बनसोडे, डॉ समीर पवार, स्पर्धा निरीक्षक डॉ सुरेश फराकटे, डॉ संजय पाटील, आदी उपस्थित होते. प्रा. किरण पाटील, प्रा. सुचय खोपडे, केदार सुतार , अमित दलाल, सुनील देसाई, आमिर मुल्ला, सूरज वाघेला , अजित तिवडे यांनी संयोजन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes