मेडीकल, फिजिओथेरपी संघाना व्हॉलीबॉल स्पर्धेचे विजेतेपद
schedule24 Nov 25 person by visibility 11 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत आयोजित आंतरमहाविद्यालय व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलांमध्ये डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेज संघाने तर मुलींमध्ये डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी संघाने विजेतेपद पटकावले. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कदमवाडी येथे २२ नोव्हेंबर रोजी या स्पर्धा झाल्या. डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ.राजेश ख्यालप्पा यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी विद्यार्थी विकास संचालक डॉ. अद्वैत राठोड, उपकुलसचिव संजय जाधव, स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीचे प्राचार्य रुधीर बारदेस्कर, क्रीडा संचालक शंकर गोनुगडे, डॉ. जगनाथ शेटे, सुशांत कायपुरे यांच्यासह सर्व कॉलेजचे क्रीडा प्रमुख व खेळाडू उपस्थित होते. या स्पर्धेत मुलांचे सहा संघ व मुलींचे पाच अशा एकूण 11 संघाचा सहभाग होत. मुलांच्या गटात डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी तर मुलींमध्ये डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ फार्मसी संघाने उपविजेतेपद मिळवले. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ.राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.