सत्ताधाऱ्यांची आश्वासने नकोत, महादेवी हत्तीण किती दिवसात परत येणार ते सांगा-सतेज पाटील
schedule02 Aug 25 person by visibility 41 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महादेवी हत्तीण परत आणण्याचे सत्ताधाऱ्यांनी केवळ आश्वासन देण्याऐवजी ही हत्तीण किती दिवसात परत येणार हे ठोस पणे जनतेसमोर जाहीर करावे असे आव्हान विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केले २ लाख ४ हजार चारशेह एकवीस स्वाक्षरींचे फॉर्म राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आले. नांदणी मठाचे महास्वामीजी यांच्या हस्ते या फॉर्मचे पूजन झाल्या नंतर शनिवारी दुपारी आमदार पाटील यांच्या हस्ते रमणमळा येथील पोस्ट कार्यालयामध्ये हे सर्व अर्ज भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना पाठवण्यात आले. राष्ट्रपतींनी आता यामध्ये लक्ष घालून, महादेवी हत्तीण परत यावी यासाठी, हस्तक्षेप करावा अशी मागणीही आमदार पाटील यांनी केली. दरम्यान शुक्रवारी वनताराचे सीईओ कोल्हापुरात आले होते. याची कल्पना विरोधी आमदारांना दिली गेली नसल्याने यावर आमदार सतेज पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, बयाजी शेळके, युवराज गवळी, माजी नगरसेवक प्रकाश पाटील, राजेश लाटकर, ईश्वर परमार, अर्जुन माने, विनायक फाळके, अमर समर्थ,राजू साबळे, दिग्वीजय मगदूम, जय पटकारे, मोहन सालपे, शाशिकांत पाटील, सर्जेराव साळोखे, सुरेश ढोणुक्षे, सुदर्शन खोत, विजय पाटील, सुनिल पाटील, सचिन पाटील, अनिल पाटील, दिपक मगदूम, संजय पटकारे, प्राचार्य महादेव नरके बजरंग रणदिवे आदी उपस्थित होते.