हॉटेल मालक संघातर्फे बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन
schedule02 Aug 25 person by visibility 40 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूरला हायकोर्टाचे सर्किट बेंच मंजूर झाल्याबद्दल कोल्हापूर बार असोसिएशनच्या सर्व पदाधिका-यांचे कोल्हापूर हॉटेल मालक संघातर्फे अभिनंदन करणेत आले. त बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. व्ही. आर. पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष सचिन शानभाग यांनी अभिनंदन केले. याप्रसंगी हॉटेल मालक संघाचे उपाध्यक्ष अरुण भोसले चोपदार, माजी अध्यक्ष उज्वल नागेशकर, संघाचे सचिव सिध्दार्थ लाटकर, खजानिस सुशांत पै, प्रसाद कामत, उमेश राऊत, सुहास लाड, जय कामत, शंकरराव यमगेकर. यावेळी बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. अजित मोहिते व पदाधिकारी, आदी उपस्थित होते.