Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात बुधवारी संघ गंगा के तीन भगीरथ नाटकाचा प्रयोग, आरएसएसची वाटचाल उलगडणार पाचा फबदेवराज बोटिंगचे अमर जाधव यांना पर्यावरण जीवन गौरव पुरस्कारमहादेवीसाठी सुरु असलेल्या लढ्याला कोल्हापूरच्या मुस्लिम समाजाचा  पाठिंबा सर्किट बेंच मंजुरीबद्दल शिवसेनेकडून साखरपेढे वाटून आनंदोत्सव ! कोल्हापूरच्या विकासात मोलाची भर –राजेश क्षीरसागर सर्किट बेंचच्या निर्णयाबद्दल भाजपाचा आनंदोत्सव !सत्ताधाऱ्यांची आश्वासने नकोत, महादेवी हत्तीण किती दिवसात परत येणार ते सांगा-सतेज पाटीलहॉटेल मालक संघातर्फे बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदनधुआँ जो कुछ घरों से उठ रहा है…न पूरे शहर पर छाए, तो कहना ! मुख्याध्यापकांच्या कार्यशाळेत विद्यार्थी सुरक्षेचे उपाय

जाहिरात

 

सर्किट बेंचच्या निर्णयाबद्दल भाजपाचा आनंदोत्सव !

schedule02 Aug 25 person by visibility 53 categoryराजकीय

कोल्हापूर दिनांक 2 मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात येत्या १८ ऑगस्टला सुरू होत असून कोल्हापूर जिल्ह्याची चाळीस वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. 

आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी एकत्रित येत ढोल ताशाच्या गजरात ठेका धरत, साखर पेढे वाटप केले. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, देवेंद्र फडणवीस तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, चंद्रकांत पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा याप्रसंगी देण्यात आल्या.

खासदार धनंजय महाडिक म्हणाले, लोकलढा, नेते मंडळींची एकत्रित भूमिका यांच्या ताकदीबरोबर राज्यसरकारच्या इच्छाशक्तीमुळेच असे महत्वपूर्ण निर्णय होत आहेत. या निर्णयामुळे राज्यभरातून कोल्हापूरला येणारा ओढा वाढणार असून कोल्हापूरच्या विकासाला चालना मिळणार आहेत. या सर्वांच्या सोबत जिल्हा बार असोसिएशनचे विशेष अभिनंदन कारण ज्यांनी हा प्रश्न चिकाटीने लावून धरला आणि पूर्णत्वास नेला. प्रदेश सचिव महेश जाधव म्हणाले, सर्किट बेंचमुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याप्रसंगी ॲड संपतराव पवार यांनी सरकारचे अभिनंदन केले.

यावेळी डॉ. राजवर्धन, गायत्री राऊत, हेमंत आराध्ये, अप्पा लाड़, विराज चिखलीकर, शैलेश पाटील, राजू मोरे, गणेश देसाई, धनश्री तोड़कर, भरत क़ाळे, संतोष भिवटे, विजय सूर्यवंशी, अतुल चव्हाण, तौफ़ीक़ बागवान, दिग्विजय कालेकर, अमर साठे, राजसिंह शेलके, धीरज पाटील, विशाल शिरालकर, रविकिरण गवली, कोमल देसाई, प्रीतम यादव, सुनील पाटील, राजगणेश पोळ, गिरीश साळोखे, अनिल कामत, संतोष माळी, माणिक पाटील चुयेकर, प्रसाद जाधव, विजय खाड़े-पाटील, प्रग्नेश हमलाई, हर्षद कुंभोजकर, अशोक लोहार, सतीश अंबरडेकर, अॅड.परवेज पठान, अॅड.संगीता तांबे, अमित पसारे, संजय जासूद, विशाल शिराळे, नरेंद्र पाटील, दिलीप बोंदे, राजू जाधव, योगेश ओटवकर, अवधूत भाट्ये, रिमा पालनकर, संग्रामसिंह निकम, सुनीता सूर्यवंशी, जयश्री वायचळ आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes