Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात बुधवारी संघ गंगा के तीन भगीरथ नाटकाचा प्रयोग, आरएसएसची वाटचाल उलगडणार पाचा फबदेवराज बोटिंगचे अमर जाधव यांना पर्यावरण जीवन गौरव पुरस्कारमहादेवीसाठी सुरु असलेल्या लढ्याला कोल्हापूरच्या मुस्लिम समाजाचा  पाठिंबा सर्किट बेंच मंजुरीबद्दल शिवसेनेकडून साखरपेढे वाटून आनंदोत्सव ! कोल्हापूरच्या विकासात मोलाची भर –राजेश क्षीरसागर सर्किट बेंचच्या निर्णयाबद्दल भाजपाचा आनंदोत्सव !सत्ताधाऱ्यांची आश्वासने नकोत, महादेवी हत्तीण किती दिवसात परत येणार ते सांगा-सतेज पाटीलहॉटेल मालक संघातर्फे बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदनधुआँ जो कुछ घरों से उठ रहा है…न पूरे शहर पर छाए, तो कहना ! मुख्याध्यापकांच्या कार्यशाळेत विद्यार्थी सुरक्षेचे उपाय

जाहिरात

 

सर्किट बेंच मंजुरीबद्दल शिवसेनेकडून साखरपेढे वाटून आनंदोत्सव ! कोल्हापूरच्या विकासात मोलाची भर –राजेश क्षीरसागर

schedule02 Aug 25 person by visibility 72 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सर्किट बेंचमुळे कोल्हापुरात येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढणार असून, त्यामुळे रोजगार निर्मितीसह इतर क्षेत्रांनाही चालना मिळणार आहे. त्यामुळे सर्किट बेंच मुळे कोल्हापूरच्या विकासात मोलाची भर पडेल. सर्किट बेंच मंजुरी हा वकिलांच्या एकजूटीचा विजय असून, आगामी काळात कायमस्वरूपी खंडपीठासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.

 कोल्हापूरसाठी ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट असून आज कोल्हापुरातील जेष्ठ विधीज्ञ  आणि कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनतर्फे आमदार क्षीरसागर  यांची भेट घेतली. शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे भेट घेवून त्यांना पेढा भरवून आभार व्यक्त केले. यावेळी शिवसेना जिल्हा व शहर कार्यकारणीच्या वतीने साखर पेठे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना उपनेत्या माजी आमदार श्रीमती जयश्रीती जाधव, माजी महापौर अॅड.महादेवराव आडगुळे, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, अॅड.व्ही.आर. पाटील, अॅड. अजित मोहिते, अॅड.इंद्रजीत चव्हाण, अॅड.शिवाजी राणे, अॅड.गिरीश खडके, अॅड.रणजीत गावडे, अॅड.आर.एल.चव्हाण, अॅड.संपत पवार, माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण, महानगरसमन्वयक कमलाकर जगदाळे, मंगल साळोखे, पूजा भोर, शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, शहरप्रमुख अमरजा पाटील,  मंगल कुलकर्णी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes