देवराज बोटिंगचे अमर जाधव यांना पर्यावरण जीवन गौरव पुरस्कार
schedule04 Aug 25 person by visibility 11 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : देवराज बोटिंग क्लबचे प्रोपायटर अमर पांडूरंग जाधव यांना पर्यावरण जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. इन्व्हायर्मेंटल क्लब ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार दिला जातो. जाधव यांनी पर्यावरणपूरक उपक्रम राबविले आहेत. २०१९ आणि २०२१ मधील महापुरादरम्यान त्यांनी कोल्हापुरात नागरिकांना मोठी मदत केली. त्यांनी, प्रशासनाला बोटी आणि कर्मचारी देऊन मदत कार्यासाठी योगदान दिले होते. रंकाळा तलाव स्वच्छतेसाठी पुढाकार असतो. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आल. याप्रसंगी पद्मश्री डॉ. जी.डी. यादव, गणपतराव पाटील, विश्वेश्वर सहकारी बँकेचे संचालक रविंद्र मिरजे, स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख यांची उपस्थिती होती. हा पुरस्कार पुणे येथील फिरोदिया सभागृह, भांडारकर प्राच्यविद्या सभागृह येथे झाला.