मुख्याध्यापकांच्या कार्यशाळेत विद्यार्थी सुरक्षेचे उपाय
schedule02 Aug 25 person by visibility 25 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : दिवसेंदिवस सामाजिक वातावरण बिघडत चालले आहे परिणामी असुरक्षितता वाढत आहे . शाळेत जाणाऱ्या बालकासही आज सुरक्षेची अधिक गरज आहे. यासाठी शाळा प्रशासन आणि शाळेतील प्रत्येक घटकाने अधिक सजग रहाणे गरजेचे आहे असे प्रतिपादन माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी आर. जी . चौगुले यांनी केले. कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ व माध्यमिक शिक्षण विभाग यांचेवतीने आयोजित विद्यार्थी सुरक्षाविषयक मुख्याध्यापक कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संघाचे सचिव आर . वाय . पाटील होते . या कार्यशाळेत लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण, चिराग अॅपवर तक्रारीची नोंदणी, पोक्सो कायदा, गुडटच बॅडटच याची जाणिव, दर्शनी फलकावरील माहिती, तक्रारपेटी, सीसीटीव्ही, विविध समित्यांचे गठण, विद्यार्थी वहातुकीवरील नियंत्रण, प्रसाधन गृहाची स्वच्छता आदी सुरक्षाविषयक चर्चा झाली. कार्यशाळेत मुख्याध्यापकांनी विचारलेल्या प्रश्नांना तज्ञांनी उत्तरे दिली . महानगर पालिकेच्या प्राथमिकशिक्षण विभागाचे प्रशासनअधिकारी डी. सी .कुंभार, संघाचे सचिव आर. वाय पाटील, बी. बी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले . याप्रसंगी सुरेश संकपाळ, बसवराज वस्त्रद, संजय पाटील, संजय सौंदलगे, शशिकांत सावंत, विजय भोगम, धनाजी बेलेकर, एकनाथ कुंभार विजय भोगम उपस्थित होते .