शिवाजी विद्यापीठ नियतकालिक स्पर्धेत विवेकानंद कॉलेज प्रथम
schedule22 Oct 24 person by visibility 373 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातर्फे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी आणि विदयार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी दरवर्षी संलग्न महाविद्यालयांसाठी उत्कृष्ठ वार्षिक नियतकालिक स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेत गेली अनेक वर्षे प्रथम क्रमांक पटकाविण्याच्या कामगिरीत विवेकानंद महाविद्यालयाने सातत्य ठेवले आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या शैक्षणिक वर्षामधील स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये विवेकानंद कॉलेजच्या विवेक वार्षिक नियतकालिकाने बिगर व्यावसायिक गटात प्रथम क्रमांक पटकाविला.
या नियतकालिकाचे संपादक म्हणून प्रा. डॉ.आरिफ महात यांनी काम पाहिले आहे. नियतकालिकाच्या निर्मितीसाठी ज्युनिअर व सिनिअर विभागातील प्राध्यापकांच्या संपादक मंडळाचे सहकार्य लाभले. या यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्था सचिव प्राचार्या शुभांगी गावडे, सीईओ कौस्तुभ गावडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, रजिस्ट्रार आर.बी.जोग यांनी अभिनंदन केले आहे.