गोकुळच्या कार्यक्रमात उलगडले आनंदी तणावमुक्त जीवनचे रहस्य
schedule19 Nov 24 person by visibility 100 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : आपले शरीर चांगले असेल तर मन चांगले राहते आणि मन चांगले असेलतर जीवन तणावमुक्त होऊन आपण आनंदी जीवन जगू शकतो असे प्रतिपादन प्रसिद्ध आयुर्वेद कन्सल्टंट डॉ. मनिषा भोजकर यांनी केले.
७१ व्या अखिल भारतीय सहकार सप्ताह अंतर्गत गोकुळतर्फे ‘आनंदी तणावमुक्त जीवन’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. याप्रसंगी लेखिका भोजकर व गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी भोजकर म्हणाल्या, जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या जीवनात अगणित ताण तणावांस प्रत्येकास सामोरे जावेच लागते. परंतु, त्याची तीव्रता कमी करून जीवन सुसह्य करण्यासाठी येणारे ताणतणाव जाणून घेऊन त्याला सामोरे गेल्यास तसेच योग्य व्यायाम, सात्विक आहार, शांत झोप, मनशांती, उत्तम सूर्यप्रकाश, संगीत, हसणे, निसर्गात वावरणे, समाज्यासाठी जगणे व आई-वडिलांचा चेहरा नेहमी आनंदी ठेवल्यास आपण सर्वजण आनंदमय तणावमुक्त जीवन जगू शकतो
निता कामत यांनी प्रास्ताविक केले. डॉ.एम.पी.पाटील यांनी सूत्रसंचालन केले.मृण्मयी सातवेकर यांनी आभार मानले. याप्रसंगी जिल्हा सहकार विकास अधिकारी बी.जी.साळोखे, तात्यासाहेब मोहिते सहकार प्रशिक्षण केंद्राचे प्रा.एस.टी.जाधव, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ.प्रकाश साळुंखे, संकलन व्यवस्थापक एस.व्ही.तुरंबेकर, दत्तात्रय वागरे, डॉ.प्रकाश दळवी, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, महिला नेतृत्व विकास अधिकारी निता कामत, संपदा थोरात उपस्थित होत्या.