उमा बनछोंडेनी दाखल केला उमेदवारी अर्ज
schedule30 Dec 25 person by visibility 92 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक सातमधून काँग्रेसच्या उमेदवार उमा बनछोडे, नितीन ब्रह्मपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. कार्यकर्ते व कुटुंबांतील सदस्यांच्यासोबत जाऊन साधेपणाने त्यांनी अर्ज सादर केले. दुधाळी पॅव्हेलियन येथील निवडणूक कार्यालय येथे अर्ज स्वीकृती झाली. माजी नगरसेविका उमा शिवानंद बनछोडे या दुसऱ्यांदा निवडणूक लढवित आहेत. २०१५ ते २०२० या कालावधीत त्या नगरसेवक होत्या. मंगळवारी, उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या सोबत माजी नगरसेवक श्रीकांत बनछोडे, सामाजिक कार्यकर्ते शिवानंद बनछोडे, प्रकाश भोसले, शिवाजी माजगावकर, नितीन कोगनुळे, विश्वनाथ बनछोडे, साई वडणगेकर, दिपक माजगावकर, शिवाजी माजगावकर यांच्यासह कार्यकर्ते होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी उमेदवारांनी कुंभार गल्ली येथलील दत्त महाराज, नृसिंह महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले. माजी नगरसेविका उमा बनछोडे या जागरुक लोकप्रतिनिधी म्हणून परिचित आहेत. काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर दुसऱ्यांदा विश्वास दाखवित उमेदवारी दिली आहे.