महायुतीचे उमेदवार घोषित, २३ नगरसेवकांचा समावेश ! शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल ! !
schedule30 Dec 25 person by visibility 102 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोल्हापूर महापालिकेसाठी उमेदवारांची घोषणा मंगळवारी केली. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीच्या अनेक उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन केले. महायुतीचा विजय असो अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. महापालिकेच्या ८१ जागासाठी महायुतीमध्ये भाजपला ३६ जागा, शिवसेना ३० आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष १५ जागा लढवित आहे. उमेदवारांच्या यादीमध्ये माजी नगरसेवकांची संख्या २३ आहे. आमदार राजेश क्षीरसागर, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास यांच्या सहीनिशी उमेदवारांची यादी प्रसिद्धीस दिली आहे.
प्रभाग एक व दोनमध्ये शिवसेनेचा वरचष्मा...
महायुतीचे उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत, प्रभाग क्रमांक एकमध्ये चारही उमेदवार शिवसेनेचे आहेत. प्रभागातील एक अ अनुसूचित जाती प्रवर्गातून अमर भगवान साठे,, ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटातून अंजली अशोक जाधव, सर्वसाधारण महिला गटातून प्रियांका प्रदीप उलपे, आणि सर्वसाधारण गटातून कृष्णा दिलीप लोंढे उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक दोनमध्येही शिवसेनेने चार उमेदवार दिले आहेत. यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातून वैभव दिलीप माने, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलामधून अर्चना उमेश पागर, सर्वसाधारण महिला गटातून प्राजक्ता अभिषेक जाधव तर सर्वसाधारण गटातून स्वरुप सुनील कदम यांची उमेदवारी आहे. माजी महापौर सुनिल कदम यांचे पुत्र स्वरुप हे निवडणूक लढवित आहेत.
प्रभाग क्रमांक तीनमध्ये चारही उमेदवार भाजपचे आहेत. तीनमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गमधून प्रमोद भगवान देसाई, सर्वसाधारण महिला वंदना विश्वजीत मोहिते, राजनंदा महेश महाडिक, आणि सर्वसाधारण गटातून विजयेंद्र विश्वासराव माने उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक चारमध्ये अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून योगिता प्रविण कोडोलीकर, नागरिकांचा मागास प्रवर्गातून दिलीप हणमंत पोवार, सर्वसाधारण महिला गटातून स्मिता मारुती माने, सर्वसाधारण गटातून संजय बाबूराव निकम हे उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक पाचमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातून शिवसेनेचे अनिल हिंदुराव अधिक, भाजपतर्फे सर्वसाधारण महिला गटातून मनाली धीरज पाटील, सर्वसाधारण महिला गटातून पल्लवी निलेश देसाई, आणि सर्वसाधारण गटात शिवसेनेतर्फे समीर सदाशिव यवलुजे रिंगणात आहेत.
माधवी गवंडी, नंदकुमार मोरे प्रभाग सहामध्ये.... ऋतुराज क्षीरसागर प्रभाग सातमध्ये
प्रभाग सहामध्ये अनुसूचित जाती गटातून शिवसेनेतर्फे शिला अशोक सोनुले, नगरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौर माधवी प्रकाश गवंडी, सर्वसाधारण महिला गटात भाजपतर्फे दिपा दीपक काटकर तर सर्वसाधारण गटात शिवसेनेतर्फे नंदकुमार बाळकृष्ण मोरे उमेदवार आहेत.प्रभाग क्रमांक सातमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातून भाजपतर्फे विशाल किरण शिराळे, सर्वसाधारण महिला गटात भाजपच्या दिपा अजित ठाणेकर, सर्वसाधारण महिला गटात शिवसेनेतर्फे मंगल महादेव साळोखे, सर्वसाधारण गटात ऋतुराज राजेश क्षीरसागर उमेदवार आहेत.
प्रभाग क्रमांक आठमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटातून शिवसेनेतर्फे अनुराधा सचिन खेडकर, सर्वसाधारण महिला गटातून भाजपच्या शिवानी संजय पाटील, सर्वसाधारण गटात राष्ट्रवादीच्या अमिता हेमंत कांदेकर, आणि सर्वसाधारण गटातून शिवसेनेच्या शिवतेज अजित खराडे उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक नऊमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातून भाजपतर्फे विजय वसंतराव देसाई , सर्वसाधारण महिला गटातून संगिता संजय सावंत व माधवी मानसिंग पाटील तर सर्वसाधारण गटातून शारंगधर देशमुख हे उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक दहामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातून अजय पांडूरंग इंगवले, सर्वसाधारण महिला गटातून भाजपच्या पूर्वा सागर राणे, सर्वसाधारण महिला गटात भाजपकडून अर्चना उत्तम कोराणे तर सर्वसाधारण गटातून राष्ट्रवादीकडून महेश आबासो सावंत उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक अकरामध्ये अनुसूचित जाती महिला गटात भाजपकडून निलांबरी गिरीष साळोखे, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटात राष्ट्रवादीच्या यशोदा प्रकाश मोहिते, सर्वसाधारण गटात शिवसेनेचे सत्यजित चंद्रकांत जाधव, सर्वसाधारण गटात भाजपकडून माधुरी किरण नकाते उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक बारामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातून शिवसेनेचे आश्किन गणी आजरेकर, सर्वसाधारण महिला गटात शिवसेनेकडून संगीता रमेश पोवार, सर्वसाधारण महिला गटात राष्टवादीकडून हसीना बाबू फरास, सर्वसाधारण गटात आदिल बाबू फरास हे उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक तेरामध्ये अनुसूचित जाती महिला गटातून भाजपकडून माधुरी राजेश व्हटकर, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला रेखा रामचंद्र उगवे,सर्वसाधारण गटातून राष्ट्रवादीकडून नियाज असिफ खान, सर्वसाधारण गटातून शिवसेनेकडून ओंकार संभाजी जाधव हे उमेदवार आहेत.
प्रभाग क्रमांक चौदामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटात राष्ट्रवादीकडून प्रेमा शिवाजी डवरी, सर्वसाधारण महिला गटात भाजपकडून निलिमा शैलेश पाटील, सर्वसाधारण गटात शिवसेनेकडून प्रकाश रामचंद्र नाईकनवरे, सर्वसाधारण गटात शिवसेनेकडून अजित जयसिंग मोरे यांची उमेदवारी आहे. प्रभाग क्रमांक पंधरामध्ये अनुसूचित जाती प्रवर्ग गटात भाजपतर्फे मोहिनी जयदीप घोटणे, नागरिकांचा मागास प्रवर्ग गटात राष्ट्रवादीच्या जस्मीन आजम जमादार, सर्वसाधारण महिला गटात भाजपकडून सृष्टी करण जाधव, सर्वसाधारण गटात शिवसेनेकडून दुर्गेश उदयराव लिंग्रस उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक सोळामध्ये चारही उमेदवार भाजपचे आहेत. यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गमध्ये भाजपकडून विलास भैरु वास्कर, सर्वसाधारण महिला गटात अपर्णा रोहित पोवार, सर्वसाधारण गटात पूजा सतीश पोवार, सर्वसाधारण गटात मुरलीधर पांडूरुग जाधव हे उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक सतरामध्ये चारही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. यामध्ये अनुसूचित जाती महिला गटात प्रियांका विश्वविक्रम कांबळे, नागरिकांचा मागास प्रवर्ग गटात रवींद्र कल्लाप्पा मूतगी, सर्वसाधारण महिला गटात जाहिदा राजू मुजावर, सर्वसाधारण गटात राजेंद्र रामचंद्र पाटील यांना उमेदवारी दिली आहे.
प्रभाग क्रमांक अठरामध्ये अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून राष्ट्रवादीकडून शिवानी स्वप्नील गुर्जर, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटात शिवसेनेकडून केसर इस्माइल बागवान, सर्वसाधारण गटातून भाजपच्या रुपाराणी निकम, सर्वसाधारण गटातून भाजपचे बबन आप्पासाहेब मोकाशी यांना तिकीट दिले. प्रभाग क्रमांक १९ मध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातून भाजपकडून राहुल भालचंद्र चिकोडे, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटात राष्ट्रवादीकडून मानसी सतीश लोळगे, सर्वसाधारण महिला गटात भाजपकडून रेणू युवराज माने, सर्वसाधारण गटात विजयसिंह खाडे पाटील हे उमेदवार आहेत.प्रभाग क्रमांक वीसमध्ये अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून भाजपकडून सुषमा संतोष जाधव, नागरिकांचा मागास प्रवर्ग गटात भाजपकडून वैभव अविनाश कुंभार, सर्वसाधारण महिला गटात भाजपकडून नेहा अभय तेंडूलकर, सर्वसाधारण गटात शिवसेनेकडून अभिजीत शामराव खतकर यांची उमेदवारी घोषित केली आहे.