प्रभाग क्रमांक चारमधून योगिता प्रवीण कोडोलीकरांनी भरला अर्ज
schedule30 Dec 25 person by visibility 161 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : प्रभाग क्रमांक चारमधून प्रयोदी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा योगिता प्रवीण कोडोलीकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रयोदी फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम, गरजूंना मदत, नवोदितांना मार्गदर्शन करण्यात त्यांचा पुढाकार असतो. गेली अनेक वर्षे त्या सामाजिक कार्यात सहभागी आहेत. कोरोना काळात संस्थेने अनेकांना मदत केली. जीवनावश्यक वस्तूंचे कीट दिले. त्या उच्चशिक्षित आहेत. महिला सक्षमीकरणावर भर आहे. महापालिकेची निवडणूक पहिल्यांदा लढवित आहेत. त्यांच्या उमेदवारीविषयी बोलताना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास म्हणाले, ‘‘राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून योगिता कोडोलीकर या निवडणूक लढवित आहेत. अनुसूचित जाती महिला प्रवर्ग गटातून त्यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसने निश्चित केली आहे. पक्षाकडून त्यांना एबी फॉर्म दिला आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.’