Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मंत्र्यांनी केले कौतुक ! निवडणुकीच्या घडामोडीतील मास्टर मंडळी ! !बंडखोरीचे वारे ! रामुगडे, जरग, चव्हाण लढणार अपक्ष म्हणून! नेजदारांच्याकडे लक्ष !शिवसेना ठाकरे पक्षाकडून सहा उमेदवारांची घोषणाकोल्हापुरात सोमवारी 22 माजी नगरसेवकांनी भरला उमेदवारी अर्ज महायुतीचे जागा वाटप जाहीर ! भाजप 36, शिवसेना 30, राष्ट्रवादीला 15 जागा !!महायुतीचा जागावाटपाचा फॉर्मुला निश्चित! संध्याकाळी अधिकृत घोषणा होणार !!पुरुषोत्तम महाकरंडकाच्या कॉमर्स कॉलेजची ग्वाही एकांकिका द्वितीय काँग्रेसचे माजी नगरसेवक अशोक जाधव शिवसेनेत गोकुळची दूध संस्थांसाठी जुनी मिल्को टेस्टर मशीन बायबॅक योजनापुस्तकातून नितीमूल्यांची शिकवण, अनुभवांची शिदोरी - कवी डॉ. दिलीप कुलकर्णी

जाहिरात

 

मंत्र्यांनी केले कौतुक ! निवडणुकीच्या घडामोडीतील मास्टर मंडळी ! !

schedule30 Dec 25 person by visibility 80 categoryमहानगरपालिका

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन :स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे जागा कमी आणि इच्छुकांची संख्या जास्त. यंदा तर कोल्हापूर महापालिकेची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होत आहे. चार सदस्यीय प्रभाग रचनेत पुन्हा आरक्षणनिहाय उमेदवारीयामुळे जागा वाटप आणि उमेदवारी निश्चित करण्याची प्रक्रिया अतिशय क्लिष्टशिवाय उमेदवार निवडताना विरोधी आघाडीतील उमेदवार कोण असणार ? मतदारसंघातील प्राबल्यस्थानिक राजकारण, गटतट या साऱ्या बाबीची सांगड घालत सक्षम उमेदवार निवडणे म्हणजे मोठी कसोटी. पुन्हा स्वपक्ष किंवा युतीमध्ये नाराजी वाढणार नाही याची दखल घ्यावी लागते. इतक्या कामासाठी नेतेमंडळी वेळ देऊ शकत नाहीत. आपसूकच ही जबाबदारी पडते, ज्या त्या पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांवर. राजकारणात त्यांना कारभारी या नावांनी ओळखतात. मात्र अशा मंडळींना गौरवोल्लेख मास्टर या शब्दांत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.

महायुतीतील घटक पक्षात समन्वय ठेवणे, प्रभागनिहाय उमेदवार ठरविणे, आरक्षणनिहाय त्यांची निश्चिती करणे , मतदारसंघातील प्राबल्य तपासणे, विरोधी उमेदवारांच्या ताकतीचा अंदाज घेणे आणि त्यानुसार रणनिती ठरविणे अशा जबाबदाऱ्या या मास्टर मंडळींना पार पाडाव्या लागतात. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील या मंडळीच्या कामगिरीचे मंत्री मुश्रीफ यांनी सर्व नेतेमंडळीसमोर कौतुक केले. महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर करताना मास्टर मंडळीचा विशेष उल्लेख झाला. मुश्रीफांनी विशेष करुन प्रा. जयंत पाटील, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम, भाजपाचे प्रदेश सचिव महेश जाधव, स्थायी समितीचे माजी सभापती व शिवसेनेचे पदाधिकारी शारंगधर देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आदिल फरास या मंडळींनी उमेदवार निश्चितीची चर्चा, जागा वाटपमध्ये महत्वाची जबाबदारी पार पडल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी आवर्जून उल्लेख केला.

प्रा. जयंत पाटील, सत्यजिक कदम, शारंगधर देशमुख, आदिल फरास हे गेली अनेक वर्षे महापालिकेत सक्रिय आहेत. प्रा. पाटील यांनी तर माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार विनय कोरे, मंत्री मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांच्यासोबत काम केले. निवडणूक विधानसभेची असो की लोकसभेची, कारखान्याची असो की दूध संघाची प्रा. पाटील यांचा त्यामध्ये सहभाग. कधी पडद्यामागे राहून तर कधी खुलेपणाने मैदानावर उतरत जोडण्या लावण्यात ते माहीर. कदम, देशमुख आणि फरास यांनी महापालिकेत गटनेता म्हणून जबाबदारी सांभाळताना पक्षीय नगरसेवकांची एकजूठ ठेवणे, सभागृहातील कामकाजात सहभाग, धोरणात्मक बाबीवर चर्चा याबाबीत आघाडीवर. निवडणूक काळात उमदेवारांची निवड, मुलाखती, यामध्ये सहभाग ठरलेला. महेश जाधव हे संघटनात्मक पातळीवर काम करणारे. शहराध्यक्ष ते प्रदेश सचिव असा प्रवास. प्रत्येक निवडणुकीत आघाडीवर. कधी आक्रमकपणे भाषणातून तर कधी रस्त्यावर उतरुन आंदोलनात ते पुढे. आता होत असलेल्या महापालिका निवडणुकीतही ते या सगळया घडामोडीत सहभागी होते. त्यांच्यासोबत महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांचा सहभाग. शिवसेनेचे युवा नेते ऋतुराज क्षीरसागर यांनी उमेदवारांच्या निवडी, प्रभागनिहाय शोध घेणे यामध्ये समन्वयक म्हणून काम केले.  या मास्टर मंडळीच्या यादीत आणखी दोन नावे ठळकपणे नमूद करण्यासारखी आहेत ते म्हणजे माजी महापौर सुनील कदम आणि माजी नगरसेवक सुहास लटोरे. माजी महापौर कदम हे सगळया प्रक्रियेत सहभागी होते. मात्र लटोरे यांचा सहभाग  यंदा उघडपणे दिसला नाही.

………………………..

काँग्रेसमध्येही मास्टर

काँग्रेस पक्षाने यंदा मित्रपक्षांशी चर्चा करणे, उमेदवारांचा शोध यासाठी समिती नेमली होती. मात्र यामध्ये मास्टर म्हणून अग्रभागी होते ते शहराध्यक्ष सचिन चव्हाण व स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर. दोघांनाही अनेक निवडणुकांचा अनुभव. महापालिका सभागृहात काम केलेले. दोघेही नेते मंडळींना जवळचे. निर्णय प्रक्रियेत सहभाग. यामुळे त्यांच्यावर काँग्रेसची जबाबदारी होती.  शिवाय काँग्रेस समितीत काँग्रेसचे पदाधिकारी सुर्यकांत पाटील बुद्धिहाळकर, आनंद माने, बाळासाहेब सरनाईक, तौफिक मुल्लााणी, भारती पोवार, भरत रसाळे यांचा समावेश होता. शिवसेना ठाकरे पक्षातील सुनील मोदी हे मास्टर मंडळीपैकी एक. निवडणुकीच्या घडामोडीत पडद्यामागे राहून खेळी करण्यात ते ही पटाईत. ते शिवसेनेचे पदाधिकारी जरी असले तरी काँग्रेसच्या नेतेमंडळीना तितकेच जवळचे आहेत . कायद्याचा अभ्यास, नियमावली ची माहिती आणि वाटा पळवाटा शोधत मार्ग काढण्याचा अनुभव ही मास्टर मंडळींची खासियत. तीच नेत्यांना उपयुक्त ठरत आहे  

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes