सदभावना दौडच्या माध्यमातून राजीव गांधींना अभिवादन ! काँग्रेसतर्फे शहरातून रॅली!!
schedule20 Aug 25 person by visibility 94 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त, कोल्हापूर काँग्रेसच्यावतीने सदभावना दौड काढण्यात आली. या दौडच्या माध्यमातून स्वर्गीय राजीव गांधी यांना अभिवादन करण्यात आले. माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करून या सद्भावना दोडची राजर्षी शाहू समाधी स्थळापासून सुरुवात करण्यात आली.
अमर रहे अमर रहे राजीवजी गांधी अमर रहे अशा घोषणा देत कोल्हापुरात सद्भावना दौड निघाली. छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाजवळ अभिवादन करुन ज्योत प्रज्वलित करण्यात आली. यानंतर सीपीआर चौक - दसरा चौक - व्हीनस - कॉर्नर - दाभोळकर कॉर्नर - वटेश्वर महादेव मंदिर आणि मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील राजीव गांधी पुतळ्यापर्यंत ही सद्भावना दौड काढण्यात आली.
दौडमध्ये काँग्रेसचे पदाधिकारी सुर्यकांत पाटील बुद्धीहाळकर, सरला पाटील, बाळासाहेब सरनाईक, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राजू लाटकर, आनंद माने, माजी उपमहापौर सुलोचना नायकवडी, संजय मोहिते, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, विक्रम जरग, अर्जुन माने, राहुल माने, प्रविण केसरकर, ईश्वर परमार, रियाज सुभेदार, प्रताप जाधव सरकार, रवि आवळे, जय पटकारे, विनायक फाळके, धनंजय सावंत, सुभाष बुचडे, तौफीक मुल्लाणी, मोहन सालपे, सुरेश ढोणुक्षे, दुर्वास कदम, फिरोज सौदागर, शशिकांत पाटील, अमर समर्थ, दता बामणे, रमेश चावरे, अनुप पाटील, दिग्विजय मगदूम, सर्जेराव साळोखे, शिवानंद बनसोडे, किसन कुऱ्हाडे, भैया शेटके, काका पाटील, संजय पटकारे, संपत चव्हाण, किशोर खानविलकर, महमद शरीफ शेख, अक्षय शेळके, दिपक थोरात, उमेश पाडळकर, संदीप सरनाईक, वैशाली महाडीक, चंदा बेलेकर, उज्वला चौगले, पूजा आरडे, बबन रानगे, दत्ता वारके, श्रीराम सोसायटीचे सभापती संतोष पाटील सहभागी होते.