Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचा १०० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण- चेअरमन मच्छिंद्र नाळेपीएमश्री विद्यामंदिर कणेरीवाडीत  शाळेतील पहिले पाऊल उपक्रम लोहिया हायस्कूलमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे उत्साही स्वागतसरगम म्युझिकल ग्रुपतर्फे शंभर गाणे सादरीकरणाचा रेकॉर्डशिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती सुरू करा, शिक्षकेतर सेवक संघाचे आंदोलनहद्दवाढीला विरोधच, वीस गावात  बंद ! इंचभरही जमीन महापालिकेला देणार नाही !!आर.व्हीं.चा अतिरिक्त कार्यभार काढला, डी.सी.कुंभार नवे प्रशासनाधिकारी !हद्दवाढ दृष्टीक्षेपात,  तत्वत: मान्यता-आमदार राजेश क्षीरसागरमाजी नगरसेवक रमेश पुरेकर शिवसेनेतदुरावलेल्या नगरसेवकांच्या घरवापसीसाठी राष्ट्रवादीची फिल्डींग ! भैय्या माने, युवराज पाटलांच्यावर जबाबदारी !!

जाहिरात

 

आरटीओ अधिकारी दीपक पाटील, रोहित काटकरांची बदली

schedule07 Jun 24 person by visibility 672 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांची पदोन्नतीने जळगाव येथील प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी बदली झाली. तसेच सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांची पदोन्नतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ठाणे येथे बदली झाली आहे. दीपक पाटील यांच्या बदलीनंतर रिक्त झालेल्या कोल्हापूर प्रादेशिक परिवहन अधिकारी या पदावर गडचिरोलीचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांना पदोन्नती मिळाली आहे. चव्हाण हे मूळचे बुलढाणा येथील आहेत. चव्हाण यांनी पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे बीई मेकॅनिकलचे शिक्षण पूर्ण केले. ते परिवहन विभागात २००० पासून कार्यरत आहेत. परभणी, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली येथे सेवा केली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes