आनंदयात्री फेसबुक समूहातर्फे मंगळवार एकांकिका सादरीकरण
schedule19 May 25 person by visibility 64 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : आनंदयात्री फेसबुक समूहातर्फे मंगळवारी, (२० मे २०२५ ) येथील शाहू स्मारक भवन येथे नेबर, पलंबर आणि ती, ऑलमोस्ट डेड आणि कलम ३७५ या एकांकिकांचे सादरीकरण होणार आहे. नवोदित कलाकार मंडळी आपली कला सादर करणार असून, प्रेक्षकांना दर्जेदार एकांकिकांचा आनंद घेता येणार आहे. सकाळी १०.३० वाजल्यापासून या एकांकिका सुरू होतील. दरम्यान पनवेल येथे होणाऱ्या एकांकिका स्पर्धेत कोल्हापूरच्या या तिन्ही एकांकिका सहभागी होत आहेत. आनंदयात्री फेसबुक समूह गेल्या काही वर्षांपासून सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून मराठी रंगभूमीला चालना देत आहे. या समूहाचे उपक्रम प्रमुख प्रशांत काळे यांनी सांगितले की आमचा उद्देश मराठी नाट्य परंपरेला जपताना नव्या पिढीला रंगभूमीशी जोडणे हा आहे. ही स्पर्धा नव्या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच प्रेक्षकांना दर्जेदार मनोरंजन प्रदान करेल. एकांकिक पाहण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. कोल्हापूर शहरातील व परिसरातील रसिकांनी या एकांकिकांचा जरूर आनंद घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे. या एकांकिका आयोजित करण्यासाठी उद्योजक श्रीकांत पोतनीस, गिरीश सामंत, शिरीष बंदरकर, संदीप गुळवणी यांच्यासह आनंदयात्रीच्या सदस्यांनी सहकार्य केले आहे.