Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कार्यकर्त्यांच्या अंगाला हात लावून तर बघा, राजेश क्षीरसागर हा षंढ नाही ! सतेज पाटलांना चॅलेंजकागल, करवीर, राधानगरीत चुरशीने मतदान ! जिल्ह्यात सायंकाळ सहानंतरही २०० केंद्रावर मतदारांच्या रांगा !!कसबा बावडा, सदरबझारमध्ये कार्यकर्ते आमनेसामने, घोषणाबाजीने तणावाची स्थिती नेते-उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क ! मतदारांत उत्साह, सकाळी ९ पर्यंत ७.३८ मतदान !!दाक्षिणत्या सिनेमाला साजेसा अॅक्शनपट मराठीत, रानटी चित्रपट २२ नोव्हेंबरपासून प्रदर्शितजिल्ह्यातील ३३ लाख मतदारासाठी मतदान केंद्रे सज्ज, शंभर टक्के मतदानाचा हक्क बजावावा -जिल्हाधिकारी अमोल येडगेजैन कल्याणक सर्किटसाठी ललित गांधींना लखनौ भेटीचे निमंत्रणगोकुळच्या कार्यक्रमात उलगडले आनंदी तणावमुक्त जीवनचे रहस्यअभियांत्रिकीच्या प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानप्रेमी बनवावे -निखिल पडतेसर्व घटकांच्या भरघोस पाठिंब्यामुळे अमल महाडिक हेच विजयाचा गुलाल उधाळणार -शौमिका महाडिक

जाहिरात

 

कोल्हापुरात घुमला महायुतीचा आवाज, राजेश क्षीरसागरांच्या प्रचारार्थ जंगी मोटरसायकल रॅली

schedule18 Nov 24 person by visibility 158 categoryजिल्हा परिषद

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर  : महायुतीच्या विजयाच्या घोषणा, नेत्यांच्या फोटोचे फलक, धनुष्यबाण चिन्हाच्या प्रतिकृती आणि  भगवा झेंडा फडकावित मोटारसायकल रॅलीमध्ये सहभागी झालेले हजारो कार्यकर्ते व नागरिक अशा उत्साही आणि जल्लोष वातावरणात कोल्हापूर उत्तरचे महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ फेरी निघाली. सोमवारी दुपारी शहरातील विविध भागातून निघालेल्या या मोटरसायकल रॅलीने वातावरण भगवे केले. सगळ्या नेते मंडळींचा सहभाग आणि मोठ्या संख्येने जमलेले कार्यकर्ते याद्वारे महायुतीने जंगी शक्ती प्रदर्शन केले.  महायुतीचे उमेदवार क्षीरसागर म्हणाले  " प्रचार कालावधीत नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. प्रत्येक ठिकाणी, उत्साही स्वागत झाले. नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून माझा विजय निश्चित आहे याची खात्री पटते."
  दरम्यान दसरा चौक येथून दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मोटरसायकल  रॅलीला प्रारंभ झाला. तत्पूर्वी सकाळी अकरा वाजल्यापासूनच महायुतीचे कार्यकर्ते दसरा चौकात दाखल होण्यास सुरुवात झाली. हातामध्ये भगवे झेंडे, डोक्यावर भगवी टोपी आणि जय भवानी जय शिवाजी असा घोष करत कार्यकर्त्यांच्या ताफा दसरा चौकात दाखल होत होत्या. श्रीराम व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे  फलक, गर्व से कहो हम हिंदू है व महायुतीचा विजय असो अशा मजकुराचे फलक लक्ष वेधून घेत होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या छायाचित्रांचे फलक कार्यकर्त्यांच्या हाती होते. सजवलेल्या वाहनातून दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सर्व नेतेमंडळी रॅलीत सहभागी झाले. खासदार धनंजय महाडिक, उमेदवार क्षीरसागर, पक्ष निरीक्षक उदय सावंत, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सत्यजित कदम, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुजित चव्हाण, भाजपाचे प्रदेशचे सचिव महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास, माजी नगरसेवक बाबा पार्टे यांच्यासह महायुतीतील पदाधिकारी या वाहनात होते. नागरिकांना अभिवादन आणि निवडून देण्याचे आवाहन करत रॅली मार्गस्थ झाली.      रॅलीच्या अग्रभागी हजारो कार्यकर्ते होते. दसरा चौक, आईसाहेब महाराज चौक, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, उभा मारुती चौक, साकोली कॉर्नर, ताराबाई रोड, महाद्वार रोड, पापाची तिकटी ते छत्रपती शिवाजी चौक अशी मोटरसायकल रॅली काढण्यात आली. छत्रपती शिवाजी चौक येथे रॅली दाखल होताच कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा देत हा सारा परिसर दणाणून  सोडला. कार्यकर्त्यांच्या गर्दीने हा चौक फुलला होता. यावेळी नेते मंडळींनी  "महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळेल. जिल्ह्यातील दहाही मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार निवडून येतील. कोल्हापुरात राजेश क्षीरसागर यांचा विजय निश्चित आहे " असा विश्वास व्यक्त केला.
या रॅलीमध्ये माजी महापौर नंदकुमार वळंजू, शिवसेनेचे युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर, स्थायी समितीचे माजी सभापती नंदकुमार मोरे, आशिष ढवळे, नगरसेवक राजसिंह शेळके, प्रकाश गवंडी, उत्तम कोराणे,  मारुती माने, वैभव माने, अमर क्षीरसागर, शिवसेनेचे रणजीत जाधव, दुर्गेश लिंग्रज, कमलाकर जगदाळे, अशोक पोवार, अजित सासणे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्याा संख्येने सहभागी झाले होते. या रॅलीत तरुणांची संख्या लक्षणीय होती.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes