तात्यासाहेब कोरेंनी स्थापलेल्या शिक्षण मंडळाची वाटचाल वारणा विद्यापीठापर्यंत पोहोचली - आमदार विनय कोरे
schedule10 Sep 25 person by visibility 30 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ ग्रामीण भागासाठी व शिक्षणापासून वंचित असलेल्या लोकांसाठी सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांनी सुरू केलेले श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाची वाटचाल आता वारणा विद्यापीठापर्यंत पोहोचलेली आहे. त्यांचा हा ज्ञानगंगेचा वारसा आपल्याला असाच पुढे न्यायचा आहे असे मत आमदार डॉ. विनय कोरे यांनी व्यक्त केले.
निमित्त होते वारणा विद्यापीठाच्या प्रथम नियुक्त कुलाधिकारी एन एच पाटील यांच्या सत्कार आणि पदग्रहण सोहळ्याचे. या विद्यापीठातून आता वेगवेगळ्या संकल्पना, वेगवेगळे अभ्यासक्रम, कौशल्य आधारित शिक्षण व संशोधनाचा नवाअध्याय सुरू करता येईल असे मग त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाल तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक शहाजीराव भगत उपस्थित होते.
कुलाधिकारी एन.एच. पाटील म्हणाले, ‘पुस्तके ज्ञानाबरोबर व्यावहारिक ज्ञानही ही तितकेच महत्त्वाचे आहे. पुढे ते म्हणाले की तंत्रज्ञान आणि विज्ञानाची जोड असलेली वारणा भूमी नेहमीच सगळ्यांना प्रेरणा आणि ऊर्जा देत असते. पुढे ते म्हणाले की, आपल्या कार्यासाठी नेमून दिलेल्या निर्धारित वेळेच्या अगोदर आणि त्या वेळेच्या नंतर सुद्धा आपण आपल्या कामाचा आनंद लुटता आला पाहिजे.
श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी यांनी प्रास्ताविक केले. तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य, डॉ. डी. एन. माने, यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. ए. एम. शेख, तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य, डॉ. के. एस. पाटील, अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन,प्रा. एन. आर. चोपडे व प्रा. गणेश कांबळे यांनी केले. डॉ. मार्क मोनीस यांनी आभार मानले