गोशिमाच्या अध्यक्षपदी सुनिल शेळके, उपाध्यक्षपदी संजय देशिंगे
schedule10 Sep 25 person by visibility 26 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गोकुळ शिरगांव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (गोशिमा) संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये २०२५-२६ वर्षासाठी नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानुसार गोशिमाच्या अध्यक्षपदी सुनिल पंडितराव शेळके, उपाध्यक्षपदी संजय मधुकर देशिंगे, मानद सचिव म्हणून अमोल दिलीप यादव व खजिनदारपदी राजवर्धन पोपटराव जगदाळे यांची निवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी संचालक दिपक श्रीपतराव चोरगे होते.
माजी अध्यक्ष स्वरूप जयसिंगराव कदम यांनी आपल्या कार्यकाळात झालेले औद्योगिक वसाहतीमधील विविध कामांचा आढावा घेतला. तसेच औद्योगिक वसाहतीशी संलग्न ग्रामपंचायतींना कचरा उठाव करणेसाठी केलेला प्रयत्न, वसाहतीमध्ये अग्निशमन केंद्र उभारणेसाठी केलेले प्रयत्न, औद्योगिक वसाहतीमधील अनेक प्रश्न व सुविधा तसेच गोशिमास सीएसआर प्रमाणपत्र मिळाल्याचे सांगिते. नूतन अध्यक्ष शेळके यांनी संस्थेच्या वतीने उद्योजकांच्या अडचणी सोडवणे, मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणेचे काम केले जाईल तसेच कचरा व्यवस्थापन साठी योग्य त्या उपाय योजना करणार असल्याचे नमूद केले व इतर उद्योग उपयोगी कामे करणार असल्याचा मानस व्यक्त केला. यावेळी नचिकेत कुंभोजकर, बंडोपंत यादव, अनिरुद्ध तगारे, रणजीत पाटील, विश्वजीत जगताप उपस्थित होते.