Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
स्त्यावर जनावरे, मालकांना दंड ! महापालिकेकडून राजारामपुरीत कारवाईफुटबॉलपटूची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली, निखिल खाडेचे निधनतात्यासाहेब कोरे डिप्लोमा कॉलेजच्या विद्यार्थ्यांची निकालाची यशस्वी परंपरा कायमआझाद मैदान येथील शिक्षक आंदोलनाला राजकीय नेत्यांचा पाठिंबासतेज मॅथ्समुळे विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड वाढेल – देवश्री पाटीलजिपचा  शिक्षण विभाग राज्यात अव्वल, शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांकात कोल्हापूर प्रथमस्थानी !हर्षल सुर्वे शिवसेना शिंदे गटात ! राजेश क्षीरसागरांच्या उपस्थितीत प्रवेश !!संजय पवारांचा शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा ! राजीनामा मागे घेण्यासाठी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी!!कुलगुरुंच्या हाती खडू, विभागात घेतला क्लास ! सेवानिवृत्ती दिनी शिक्षक म्हणून बजावले कर्तव्य !!माणसांच्या दृष्टीने माझ्या इतका दुसरा कोणी श्रीमंत नाही, मी धन्य झालो- भरुन पावलो !

जाहिरात

 

तात्यासाहेब कोरे डिप्लोमा कॉलेजच्या विद्यार्थ्यांची निकालाची यशस्वी परंपरा कायम

schedule30 Jun 25 person by visibility 20 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : तात्यासाहेब कोरे डिप्लोमा कॉलेज, वारणानगर येथील विद्यार्थ्यांनी उन्हाळी २०२५ परीक्षेत घवघवीत यश मिळवले. महाविद्यालयाच्या चारही विभागांतील प्रथम, व्दितीय व तृतीय वर्षात उत्तम गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपापल्या गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे. 

या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन,पालकांचे सहकार्य आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्री वारणा विविध उद्योग व शिक्षण समुहाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे व श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.व्ही.व्ही.कार्जीनी यांचे मार्गदर्शन लाभले.  या परीक्षेत यश महादेव अंबिरकर – १००/१०० (इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग – प्रथम वर्ष), प्राची प्रकाश शिंदे – १००/१०० (कॉम्प्युटर सायन्स – प्रथम वर्ष),वैष्णवी विजय मोरे – ९७/१०० (मेकॅनिकल इंजिनीअरिंग – प्रथम वर्ष) यश मिळवले. महाविद्यालयाच्या चारही विभागांतील प्रथम, व्दितीय व तृतीय वर्षात प्रथम स्थान पटकावणारे विद्यार्थी :  कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग विभाग: प्रथम वर्ष: शिंदे प्राची प्रकाश – ९० टक्के यश मिळवले.

व्दितीय वर्ष: पाटील प्रतीक युवराज – ८८.२२%,तृतीय वर्ष: मोहिते संजय दगडू – ८८.६९%, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभाग : प्रथम वर्ष: यश महादेव अबिरकर – ८३.८८%,व्दितीयवर्ष: पूजा चंद्रकांत साळुंखे – ७६.७६%,तृतीय वर्ष: योगिता दीपक जाधव – ८७.१७ टक्के, मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभाग : प्रथम वर्ष: मोरे वैश्णवी विजय – ८७.८८%,व्दितीय वर्ष: सुतार शिवम दिनेश – ७९.११%, तृतीय वर्ष : घाटगे दर्शन रवींद्र – ७९.५९ टक्के, सिव्हिल इंजिनीअरिंग विभाग:प्रथम वर्ष: साळुंखे सुयोग जयसिंग – ८२.८५%, व्दितीय वर्ष: पाटील तन्वी दत्तात्रय – ८८.०८%, तृतीय वर्ष: माळी अनुराधा सुनील – ८७.५८ टक्के यश मिळवले. प्राचार्य पी.आर.पाटील ,मार्गदर्शक डॉ. पी. एम. पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes