Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
स्त्यावर जनावरे, मालकांना दंड ! महापालिकेकडून राजारामपुरीत कारवाईफुटबॉलपटूची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली, निखिल खाडेचे निधनतात्यासाहेब कोरे डिप्लोमा कॉलेजच्या विद्यार्थ्यांची निकालाची यशस्वी परंपरा कायमआझाद मैदान येथील शिक्षक आंदोलनाला राजकीय नेत्यांचा पाठिंबासतेज मॅथ्समुळे विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड वाढेल – देवश्री पाटीलजिपचा  शिक्षण विभाग राज्यात अव्वल, शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांकात कोल्हापूर प्रथमस्थानी !हर्षल सुर्वे शिवसेना शिंदे गटात ! राजेश क्षीरसागरांच्या उपस्थितीत प्रवेश !!संजय पवारांचा शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा ! राजीनामा मागे घेण्यासाठी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी!!कुलगुरुंच्या हाती खडू, विभागात घेतला क्लास ! सेवानिवृत्ती दिनी शिक्षक म्हणून बजावले कर्तव्य !!माणसांच्या दृष्टीने माझ्या इतका दुसरा कोणी श्रीमंत नाही, मी धन्य झालो- भरुन पावलो !

जाहिरात

 

सतेज मॅथ्समुळे विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड वाढेल – देवश्री पाटील

schedule30 Jun 25 person by visibility 25 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : साळोखेनगर येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्यावतीने आयोजितसतेज मॅथ्स स्कॉलरपरीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये गणिताची अधिक आवड निर्माण होईल. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होउन बौद्धिक क्षमताही विकसित होतील या माध्यमातून अभियांत्रिकीचा पायाही भक्कम होईल, असा विश्वास डी. वाय. पाटील ग्रुपच्या विश्वस्त देवश्री सतेज पाटील यांनी  व्यक्त केला. या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या बक्षीस वितरण समारंभात त्या बोलत होत्या

या परीक्षेत सृष्टी किरापिले   आकांक्षा तेजम यांनी प्रथम क्रमांक पटकावला. सार्थक वारके अर्पिता पाटील यांनी द्वितीय  तर संजीवनी माने शुभांगी कडोलकर यांनी तृतीय क्रमांक मिळवला. त्यांना अनुक्रमे २५ हजार रुपये, १५ हजार रुपये आणि १० हजार रुपयांची बक्षिसे प्रदान करण्यात आली.

कार्यकारी संचालक डॉ..के. गुप्ता म्हणाले, गणिताचा वापर केवळ शालेय अभ्यासापुरता मर्यादित नाही. तो दैनंदिन जीवनात व्यावसायिक क्षेत्रातही तितकाच उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांनी या विषयाची भीती बाळगता आत्मविश्वासाने अभ्यास करावा.कॅम्पस संचालक डॉ. अभिजीत माने म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीसतेज मॅथ्सपरीक्षा सारखे उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरतात. यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतून जवळपास २५०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

या समारंभास प्राचार्य डॉ. सुरेश डी. माने, प्रशासकीय अधिकारी सुयोग पाटील यांच्यासह सर्व विभागप्रमुखप्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. सौ. वनश्री शिंदे यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील विश्वस्त तेजस पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes