Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
स्त्यावर जनावरे, मालकांना दंड ! महापालिकेकडून राजारामपुरीत कारवाईफुटबॉलपटूची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली, निखिल खाडेचे निधनतात्यासाहेब कोरे डिप्लोमा कॉलेजच्या विद्यार्थ्यांची निकालाची यशस्वी परंपरा कायमआझाद मैदान येथील शिक्षक आंदोलनाला राजकीय नेत्यांचा पाठिंबासतेज मॅथ्समुळे विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड वाढेल – देवश्री पाटीलजिपचा  शिक्षण विभाग राज्यात अव्वल, शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांकात कोल्हापूर प्रथमस्थानी !हर्षल सुर्वे शिवसेना शिंदे गटात ! राजेश क्षीरसागरांच्या उपस्थितीत प्रवेश !!संजय पवारांचा शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा ! राजीनामा मागे घेण्यासाठी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी!!कुलगुरुंच्या हाती खडू, विभागात घेतला क्लास ! सेवानिवृत्ती दिनी शिक्षक म्हणून बजावले कर्तव्य !!माणसांच्या दृष्टीने माझ्या इतका दुसरा कोणी श्रीमंत नाही, मी धन्य झालो- भरुन पावलो !

जाहिरात

 

जिपचा  शिक्षण विभाग राज्यात अव्वल, शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांकात कोल्हापूर प्रथमस्थानी !

schedule30 Jun 25 person by visibility 442 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचेकडून शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारीनुसार (Performance Grading Index- PGI ) शैक्षणिक निर्देशांक निश्चित करण्याची कार्यवाही करण्यात येते. यासाठी युडायस प्लस माहिती, राष्ट्रीय संपादणूक पातळी व इतर शैक्षणिक माहिती अशी एकूण ७२ दर्शकांसाठी एकूण ६०० गुणांचे गुणाकंन केले जाते. या गुणाकंणाच्या आधारे राज्याचे देशातील तसेच जिल्हयाचे राज्यातील शैक्षणिक निर्देशकांमधील स्थान निश्चित करण्यात येते. यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषेच्या प्राथमिक शिक्षण विभाग राज्यात अव्वल ठरला आहे. २०२३-२४ च्या शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांकात कोल्हापूर जिल्हयाने एकूण ६०० पैकी ३४५ गुण प्राप्त करून महाराष्ट्र राज्यात प्रथम स्थान पटकावले आहे.

कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन. एस. यांनी 'मिशन उत्कर्ष" हा उपक्रम राबवला. शैक्षणिक निर्देशांकामध्ये सुधारणा करण्यासाठी विविध उपक्रमांची जोड दिली. यामध्ये शैक्षणिक निर्देशांकामधील कमी गुण मिळालेल्या निर्देशांकाचा अभ्यास करण्यात आला. निर्देशांकामध्ये सुधारणा होण्यासाठी जिल्हास्तरावरून कालबध्द कार्यक्रम निश्चित केला.  मिशन उत्कर्षची दिनदर्शिका तयार करण्यात आली व त्याची अमंलबजावणी करण्यात आली. रेनवॉटर हार्वेस्टींग ही सुविधा सर्व शाळांमध्ये दिनदर्शिकानुसार एकाच दिवशी उपलब्ध करण्यात आली. शैक्षणिक निर्देशांकामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रेझेंटेशन तयार करून सर्व तालुकानिहाय मार्गदर्शन केले.  युडायस प्लस प्रणालीमध्ये शाळांकडून माहिती भरून घेणे,  माहिती तपासणीसाठी तालुकास्तरीय कक्ष स्थापन केले. जिल्हास्तरावरून केलेल्या नियोजनाप्रमाणे कामकाज पूर्ण होण्यासाठी व त्याचा आढावा घेण्यासाठी संपर्क विस्तार अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली होती.

 २७ व २८ जून २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या दोन दिवशीय राज्यस्तरीय बैठकीमध्ये सन २०२३-२४ च्या शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांकात कोल्हापूर जिल्हयाने महाराष्ट्र राज्यात प्रथम स्थान पटकावलेबद्दल राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्या हस्ते हस्ते कोल्हापूर जिल्हयाचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर व जिल्हा डायटचे प्राचार्य, डॉ. राजेद्र भोई यांचा उत्कृष्ट कामकाजाबद्दल गौरव करण्यात आला. तसेच कोल्हापूर जिल्हयाच्या शैक्षणिक निर्देशांकामध्ये वाढीसाठी जिल्हा संगणक प्रोग्रॅमर घनःश्याम पुरेकर तसेच तालुकास्तरावरील सर्व गटशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी, एमआयएस कॉ-ऑडीनेटर व डाटा एन्ट्री ऑपरेटर यांनी विशेष परिश्रम घेतले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes