हर्षल सुर्वे शिवसेना शिंदे गटात ! राजेश क्षीरसागरांच्या उपस्थितीत प्रवेश !!
schedule30 Jun 25 person by visibility 259 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापुरातील शिवसेना ठाकरे गटाचे नवनियुक्त शहरप्रमुख हर्षल सुर्वे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. आमदार राजेश क्षीरसागर यांनी पुढाकार घेवून हा पक्षप्रवेश घडवून आणला. मुंबई येथील मुक्तगिरी या शासकीय निवासस्थानी हा पक्ष प्रवेश पार पडला. सुर्वे हे गेले वीस वर्ष शिवसेना व नंतर ठाकरे गटामध्ये कार्यरत आहेत. युवा सेना जिल्हाप्रमुख कोल्हापूर त्यानंतर रायगड जिल्हा विस्तारक कोल्हापूर जिल्हा विस्तारक या पदावर काम केले आहे. शहर समन्वयक या पदावर काम करत होते. नुकतीच त्यांना या गटामध्ये शहरप्रमुख म्हणून जबाबदारी दिली होती. शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख पदावर रविकिरण इंगवले यांची निवड झाली. त्यावरून सुर्वे हे नाराज झाले. तने इंगवले यांच्यासोबत काम करणार नाही असा पवित्रा घेत त् पदाचा राजीनामा दिला आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकाराने मुंबईमध्ये जाऊन उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचीही भेट घेतली. हर्षल सुर्वे यांच्यासोबत उपशहरप्रमुख अर्जुन संकपाळ, इंद्रनील पाटील, प्रदीप हांडे, जयाजी घोरपडे, संकेत खोत, देवेंद्र सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला.