रंगमंचावर उलगडणार रणरागिणी ताराराणींचा इतिहास, मंगळवारी कोल्हापुरात प्रयोग
schedule24 Nov 25 person by visibility 26 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : रणरागिणी ताराराणी यांचा इतिहास हा पराक्रमाचा. त्यांनी, आपल्या तलवारीच्या सामर्थ्यांवर औरंगजेबसारख्या बलाढय पातशहाला गुडघे टेकायला लावले, शत्रूंना सळो की पळो करुन सोडले. महाराणी ताराराणी यांनी कोल्हापूर येथे राजधानी स्थापन केली. त्यांचा या पराक्रमावर आधारित नाटकाची निर्मित शिवाजी नाट्य मंदिर दादर या संस्थेने केले आहे. ‘रणरागिणी ताराराणी’ या नाटकाचे अल्पावधीतच २५ प्रयोग झाले आहेत. कोल्हापुरात या नाटकाचा प्रयोग मंगळवारी २५ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित केला आहे. गायन समाज देवल क्लब येथील गोविंदराव टेंबे नाट्यगृह येथे सायंकाळी सात वाजता नाट्यप्रयोग होणार आहे. या नाटकाची संकल्पना चंद्रकांत सावंत यांची असून निर्मितीची धुरा ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सांभाळली आहे. या नाटकाचे दिग्दर्शन विजय राणे यांनी तर नाटकाचे लेखन कोल्हापूरचे लेखक युवराज पाटील यांनी केले आहे. यातील कलाकार तनिषा वर्दे, सुनील गोडसे, मुकूल देशमुख, प्रसाद धोपट, उमेश ठाकूर, ऋषिकेश शिंदे चेतन म्हस्के, मोहिका गद्रे, सिद्धी घैसास, अरुण पंदरकर, तेजस भोर, कृष्णा राजशेखर, संदिप सिंगडाने, नीलेश नाईक, प्रथमेश येवले, विक्रांत खातू, संकेत वाणी हे आहेत.