कोल्हापुरात दहा वर्षाच्या मुलीचा मृतदेह उसाच्या शेतात सापडला
schedule22 Aug 24 person by visibility 948 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोलकाता ,बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराच्या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली असताना कोल्हापूर शहराजवळील शिये येथे उसाच्या शेतामध्ये दहा वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळला. मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पार्श्वभूमीवर गुरुवारी कोल्हापुरात सन्मान योजना कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. हा दौरा सुरू असतानाच कोल्हापूर शहराजवळील शिये गावात दहा वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडल्याची घटना उघडकीस आली . पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने सुरू केली आहेत. एका संशयितला ताब्यात घेतल्याची माहिती पुढे आली आहे. पण या वृत्ताला पोलीस प्रशासनाने अ दुजोरा दिलेला नाही. या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.