महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : पॅरिस ऑलम्पिक 2024 मध्ये 50 मीटर एअर रायफल तीन पोझिशन्स प्रकारात कांस्यपदक विजेत्या कोल्हापूरच्या स्वप्नील कसाळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. ऑलम्पिक स्पर्धेमध्ये पदक जिंकल्याबद्दल स्वप्निल सुरेश कुसाळे यांना डी वाय पाटील ग्रुपतर्फे पाच लाखाचे बक्षीस देण्यात येणार आहे. आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार ऋतुराज पाटील यांनी या बक्षिसाची घोषणा केली. स्वप्निल कुसाळे हा राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी येथील आहे. त्याने नेमबाजी क्रीडा प्रकारात भारताला कांस्यपदक मिळवून दिले.