शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सोमवारच्या धरणे आंदोलनास पाठिंबा-खंडेराव जगदाळे
schedule16 Aug 25 person by visibility 38 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सरकारने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्याबाबत सोमवारी, १८ ऑगस्ट २०२५ रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला कायम विनाअनुदानित कृती समितीने पाठिंबा दिला आहे. कोल्हापूर जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे नेते मा बाबासो पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण उपसंचालक कार्यालय येथे दुपारी एक वाजता आंदालन होणार आहे. शिपाई पदावरील २४ वर्षानंतरचा दुस-या लाभाची वेतन श्रेणी ही एस-५ ऐवजी एस-४ मध्ये करणेबाबत झालेल्या आदेशामध्ये दुरुस्ती करून वेतन श्रेणी पूर्वी प्रमाणे एस-५ मध्येच करावी. शिक्षकेतर कर्मचारी भरती बंदीबाबतचा २८ मे, २०२५ चा आदेश मागे घेऊन शिक्षकेतर भरती सुरु करावी.२४ वर्षानंतरचा आश्वासीत प्रगती योजनेचा दुसरा लाभ भूतपुर्वलक्षी प्रभावाने शासकीय कर्मचा-याप्रमाणे लागू करावा, जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागण्यासाठी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला कृती समितीचा सक्रिय पाठिंबा असेल असे खंडेराव जगदाळे यांनी म्हटले आहे.