राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे स्वातंत्र्यदिन साजरा
schedule16 Aug 25 person by visibility 38 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शहर व जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, कोल्हापूरच्यावतीने देशाचा ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पक्षाचे शहर कार्यालय शिवाजी स्टेडियम येथे झालेल्या कार्यक्रमात पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष आर. के. पोवार होते. सरचिटणीस सुनील देसाई यांनी स्वागत केले. गणेश जाधव यांनी आभार मानले. सेवादल अध्यक्ष महादेव पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी अनिल घाटगे, मकरंद जोंधळे, नितीन भाऊ पाटील, हिदायत मनेर ,राजाराम पाटोळे, फिरोज सरगुर, रामराजे बदाले, रियाज कागदी, सोहेल बागवान, अरुणा पाटील, मंगल कट्टी, निलोफर बागवान, अनिता टिपुगडे, गणेश नलावडे, चंद्रकांत सूर्यवंशी, अमृत शिंदे, नागेश जाधव, राजाराम मटकर, राजाराम सुतार,आनंदराव पोलादे,राजू जमादार, सुरेश कुरणे, विनय जाधव, किसन कल्याणकर,सदानंद कवडे, निकिता माने,लहुजी शिंदे, फिरोज खान उस्ताद, रवी कांबळे उपस्थित होते