उद्योजकांनी व्यापार व्यवसायासाठी नवीन देशात जाण्यास सज्ज रहावे-कमलाकांत कुलकर्णी
schedule16 Aug 25 person by visibility 47 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘अमेरिकेने टॅक्स दरवाढविल्याने फौंड्री,मशिनशॉप, टेक्स्टाईल, मेडिकल व अशा अनेक बाबीवर विपरित परिणाम होणार आहे. शिवाय चीनशी स्पर्धा असल्याने सर्वच उद्योजकांनी नवीन जग, नविन देशांत जाण्यास सज्ज रहावे.’ असे प्रतिपादन कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी यांनी केले.
कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशन येथे स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यानंतर उद्योजकांची सभा झाली. याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी ग्राहक पंचायत महाराष्ट् कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी ग्राहक पंचायतीच्या कार्याची माहिती सांगितली. जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर भदर्गे यांनी ग्राहकांच्या हक्काबद्दल माहिती दिली. जिल्हा संघटक अशोक शां.पोतनीस यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर कोल्हापूर उद्यमवार्ता स्वातंत्रदिनाच्या विशेषांकाचे प्रकाशन इंजिनीअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. असोसिएशनचे संचालक व संपादक नितीन वाडीकर यांनी विशेषकांची माहिती दिली. यानंतर मे.एस.बी.रिशेलर्सचे व्यवस्थापकिय संचालक सचिन शिरगावकर यांना शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया,नवी दिल्ली यांचा बेस्ट इंजिनिअर्स पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
असोसिएशनचे स्विकृत संचालक सोहन शिरगावकर यांची डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल उपाध्यक्ष श्रीकांत दुधाणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास कुशल सामाणी, प्रसन्न तेरदाळकर, संजय अंगडी, दिनेश बुधले, बाबासो कोंडेकर, हर्षद दलाल, अमर करांडे, अभिषेक सावेकर, जयदिप मांगोरे, हिंदूराव कामते, सुरेश मंडलिक, अशोकराव जाधव,संजय पाटील, शामसुदंर देशिंगकर,प्रकाश चरणे, चंद्रकांत चोरगे, सुभाष चव्हाण, प्रदीप कापडिया, दिलावर शेख, नंदकुमार नलवडे, निवास मिठारी, अनिल दंडगे, सुबोध पेंडसे, फारूक हुदली, अबुकर शेख,आरिफ शेख, शैलेश पुरोहीत, सुर्यकांत खोत, पुजा वाडीकर, आदित्य कोंडेकर,सचिन गणबावले, सचिव विजय टकले उपस्थित होते.