आमदार अमल महाडिकांकडून विक्रमनगरमधील जळीतग्रस्तांना मदतीचा हात
schedule16 Aug 25 person by visibility 39 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :विक्रमनगर मधील सिद्धेश्वर शाळेजवळ राहणाऱ्या अभिजीत हनुमंत बनसोडे आणि शिवाजी हनुमंत बनसोडे यांच्या घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन प्रापंचिक साहित्य भस्मसात झाले. दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत बनसोडे कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले आहे. आमदार अमल महाडिक यांनी या ठिकाणी भेट देऊन बनसोडे कुटुंबाला धीर दिला. जळालेला घराची पाहणी करून त्वरित बनसोडे कुटुंबाला दोन महिने पुरेल इतके रेशन, कपडे आणि रोख रक्कम अशी मदत आमदार महाडिक यांनी देऊ केली. आमदार महाडिक यांच्या संपर्क कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून ही मदत बनसोडे कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आली.