Maharashtra News 1
Register

जाहिरात

 

शक्तीपीठ महामार्गच्या विरोधात शिवारात घुमला आवाज ! शेतकऱ्यांचे ठिकठिकाणी आंदोलन !!

schedule15 Aug 25 person by visibility 52 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात स्वातंत्र्यदिनी शिवारात आवाज घुमला. ‘तिरंगा झळकतोय आमच्या शिवारात-शक्तीपीठ नको आमच्या आवारात.’अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गला विरोध केला. संघर्ष समिती व इंडिया आघाडीतर्फे स्वातंत्र्यदिनी  अनोखे आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठिकठिकाणी आंदोलन झाले. ‘जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’अशा घोषणा दुमदुमल्या. शेतामध्ये झेंडा फडकावून सरकारच्या निर्णयाला विरोध केला.

करवीर तालुक्याीतल कोगिल बुद्रुक, कागल तालुक्यातील एकोंडी, भुदरगड तालुक्यातील गारगोटी-आकुर्डे रोड, आमदार पाटील, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, गोकुळचे संचालक बाबासो चौगले, प्रकाश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल देसाई, जीवन पाटील, मधुकर देसाई,  शमराव देसाई, सचिन घोरपडे, बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर, सम्राट मोरे, शिवाजी मगदूम, सागर कोंडेकर, संजय बामणकर, रामभाऊ करंबेकर, प्रकाश वास्कर, शंभूराजे देसाई यांच्यासह शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. ‘एकच जिद्द, शक्तीपीठ रद्द, शेती वाचवा-देश वाचवा, शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, ’या आशयाचे फलक शेतकऱ्यांच्या हाती होते. शक्तीपीठ महामार्गाची गरज नाही. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गच्या विरोधात संघर्ष समितीतर्फे बारा जिल्हयात आंदोलन पुकारले होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes