शहीद महाविद्यालयात दहीहंडीचा जल्लोष ! डी फार्मसीच्या विद्यार्थिनींची धमाल !!
schedule17 Aug 25 person by visibility 110 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील शहीद शिक्षण प्रसारक मंडळातर्फे आयोजित दहीहंडी सोहळ्यात डी फार्मसी विभागाच्या विद्यार्थिनीनी धमाल केली. मुलांचाच खेळ समजल्या जाणाऱ्या या दहीहंडी स्पर्धेत डी. फार्मसी विभागाच्या मुलींनी मानाची दहीहंडी फोडत सर्वांची वाहवा मिळवली. या स्पर्धेत बीसीए, बीएस्सी आयटी, डीएमएलटी, बीएएमएम, बीएस्सी मायक्रो या विभागांनी जोशपूर्ण सहभाग नोंदवला. सगळयांनी तीन स्तरापर्यत सलामी दिली.पण पहिल्याच फेरीत डी. फार्मसीच्या मुलींनी ताकदीसोबत एकजुटीची पराकाष्ठा दाखवत हंडी फोडली. “ दहीहंडी म्हटलं की मुलांचा खेळ समजला जातो. पण आज आमच्या विद्यार्थिनींनी ही पारंपरिक चौकट मोडून कर्तृत्वाचा नवा इतिहास रचला. शहीद परिवारासाठी हा क्षण अभिमानाचा आहे.” असे गौरवोद्गगार शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर यांनी काढले. कार्यक्रमाचे आयोजन कंप्युटर सायन्स विभाग व एनएनएस विभागाने केले होते. याप्रसंगी उपप्राचार्य सागर शेटगे प्रा.दिग्विजय कुंभार, प्रा. अविनाश पालकर, प्रा. वैभव कुंभार, प्रा. विशालसिंह कांबळे, प्रा. सिद्धता गौड , विनायक पाटील, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.