कोल्हापूरच्या गिर्यारोहक कस्तुरी सावेकरला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार
schedule03 Oct 24 person by visibility 155 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूरची युवा गिर्यारोहक कस्तुरी दीपक सावेकरला महाराष्ट्र सरकारच्यावतीने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. कस्तुरी सावेकरने वयाच्या २२ वर्षी जगातील सर्वात उंच समजले जाणारे माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केले आहे. मे २०२२ रोजी आठ हजार ८४८ मीटरहून अधिक उंचीचे शिखर सर करत तिरंगा फडकाविला होता. एव्हरेस्ट सर करणारी ती कोल्हापूरची पहिली कन्या आहे. लहानपणापासूनच गिर्यारोहनाची आवड जोपासणाऱ्या कस्तुरीने अष्टहजारी हे शिखर सर कले आहे. करवीर हायकर्सच्या माध्यमातून गिर्यारोहणाची तिला आवड लागली. सह्याद्रीसह हिमालयातील विविध शिखरे तिने सर केली आहेत. तिला, राज्य सरकारचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर झाल्याने कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला. कस्तुरी ही येथील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाची माजी खेळाडू आहे.