शाहू महाराजांचा वाढदिवस उत्साहात ! वाढदिनाला सामाजिक उपक्रमांची जोड, क्रीडा स्पर्धांचे आयोजन !!
schedule07 Jan 25 person by visibility 78 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा ७७ वा वाढदिवस मंगळवारी उत्साहात साजरा झाला. विविध क्रीडा स्पर्धा आणि सामाजिक उपक्रमांची जोड देत हा वाढदिवस साजरा करण्यात आला. शाहू महाराज यांना शुभेच्छा देण्यासाठी नवीन राजवाडा येथे नागरिकांची गर्दी उसळली. सकाळपासून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शाहू महाराज यांची भेट घेऊन सदिच्छा व्यक्त केल्या। देशभरातील नामांकित व्यक्तींनी फोनवरुन शुभेच्छा दिल्या.
सकाळी शाहू महाराज यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर शाहू विद्यालयात मुलांच्या समवेत त्यांनी वाढदिवस साजरा केला. नवीन राजवाडा परिसरातील लॉनवर नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. आमदार सतेज पाटील यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. त्यांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या मार्गदर्शनाने समाजकार्यासाठी प्रेरणा अशीच कायम मिळत राहो, अशा सदिच्छा व्यक्त केल्या. आमदार जयंत आसगावकर, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी टी शिर्के, जिल्हाधिकारी अमोल येडगे, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन, महानगरपालिकेच्या प्रशासक आयुक्त के मंजूलक्ष्मी, इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, बाळ पाटणकर, राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील, उद्योगपती तेज घाटगे, आदींनी शुभेच्छा दिल्या.
माजी महापौर आर के पोवार, महादेवराव आडगुळे, गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास नारायण पाटील, कर्नल कल्लोळी बसवराज, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, आरटीओ संजय भोर, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे चेअरमन के.जी पाटील, काँग्रेचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, जिल्हा बँकेचे संचालक ए वाय पाटील, माजी उपमहापौर विक्रम जरग, अर्जुन माने, संजय मोहिते, स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख, माजी नगरसेवक प्रवीण केसरकर, राजाराम गायकवाड, सुजय पोतदार, प्रकाश गवंडी, नियाज खान, विनायक फाळके, उदय फाळके, सलीम मुल्ला, जे. के. पाटील, गोकुळचे संचालक करणसिंह गायकवाड, अजित नरके, राजेंद्र मोरे, चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने, भाकपचे सतीश कांबळे, बिद्रीचे संचालक राहुल देसाई, सत्यजित दिनकरराव जाधव, सत्यजित चंद्रकांत जाधव, संपतपराव चव्हाण पाटील, हर्षल सुर्वे पाटील आदींनी शुभेच्छा व्यक्त केल्या. माजी खासदार संभाजीराजे, संयोगिताराजे, माजी आमदार मालोजीराजे, मधुरिमाराजे, यशस्विनीराजे, यशराजे यांनी सर्वांचे स्वागत केले.