क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर चषकाचे शहाजी महाविद्यालय उपविजेता
schedule22 Aug 25 person by visibility 92 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर: दसरा चौक येथील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाने शिवाजी विद्यापीठाच्या २०२३-२४ या वर्षातील क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर चषकाचे उपविजेतेपद पटकावले. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के, प्रकुलगुरू डॉ.प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. व्ही.एन.शिंदे यांच्या हस्ते महाविद्यालयाला चषक, २५ हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरवण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण, जिमखाना प्रमुख कॅप्टन डॉ. प्रशांत पाटील यांचा विद्यापीठात गौरव केला. श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे, संस्थेचे प्रशासन अधिकारी मनीष भोसले यांनी महाविद्यालय उपविजेता ठरल्याबद्दल अभिनंदन केले .
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील ३६ खेळाडूंनी अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदवला. तसेच अखिल भारतीय आंतर वद्यापीठ स्पर्धेत पॉवर लिफ्टिंग मध्ये ऋतुराज पाटील सुवर्णपदक, कया किंग मध्ये धनश्री धोकटे रौप्य पदक व स्विमिंग मध्ये पृथ्वीराज डांगे कास्यपदक पटकाविले. फुटबॉल पुरुष, बेसबॉल सॉफ्ट बॉल पुरुष, व हॉकी महिला, क्रिकेट महिला या खेळामध्ये शिवाजी विद्यापीठ स्तरावर चॅम्पियनशिप पटकावली. जवळपास दोनशेहून अधिक खेळाडूंनी वर्षभरात शिवाजी विद्यापीठ विभागीय व अंतर विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदविला. सर्व खेळाडूंनाजिमखाना विभाग प्रमुख कॅप्टन डॉ.प्रशांत पाटील यांचे खेळाडूंना मार्गदर्शन मिळाले. कॉलेजला क्रीडा महर्षी मेघनाथ नागेश्वर ट्रॉफीचे उपविजेतेपद देऊन महाविद्यालयाचा सन्मान केला. यावेळी कनिष्ठ विभागातील क्रीडा प्रशिक्षक प्रा.प्रशांत मोटे, विजय लाड उपस्थित होते