संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल मुळशीला प्रथम क्रमांकाचा उदयोन्मुख शाळा पुरस्कार
schedule13 Aug 25 person by visibility 101 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मुळशी येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल देशातील शिक्षण क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करत असल्यामुळे जयपूर येथे झालेल्या ग्लोबल एज्युकेशन अवॉर्ड कार्यक्रमांमध्ये ' प्रथम क्रमांकाची उद्योनमुख शाळा २०२५ हा सन्मान प्राप्त झाला. संजय घोडावत शिक्षण समूहाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी प्रमुख अतिथी रवी संतलानी यांच्या हस्ते हा सन्मान स्वीकारला. यावेळी एसजीआयएसचे लकी सुराणा हे ही उपस्थित होते. या सन्मानाप्रति बोलताना विश्वस्त विनायक भोसले म्हणाले, " चेअरमन संजय घोडावत यांची दूरदृष्टी व संचालिका सस्मिता मोहंती यांचे परिश्रम व विद्यार्थ्यांना सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न यामुळेच हा सन्मान प्राप्त झाला आहे. तसेच विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे हा पुरस्कार मिळाला आहे. अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा, नवोपक्रम, उत्कृष्ट निकाल, आणि शिक्षकांचे समर्पण, प्रायोगिक शिक्षणपद्धती, उच्च शिक्षित शिक्षक, जागतिक दर्जाचे शिक्षण या सर्व गोष्टीला आम्ही महत्व देतो. असे विचार व्यक्त केले." या पुरस्काराबद्दल चेअरमन संजय घोडावत व सेक्रेटरी श्रेणीक घोडावत यांनी विश्वस्त श्री विनायक भोसले, संचालिका सस्मिता मोहंती, प्राचार्या मिता शर्मा व शिक्षकांचे अभिनंदन केले.